बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विरोचक की तात्याविंचू”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “त्रिनयना देवी सध्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 27, 2024 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo audience made negative comments

"विरोचक की तात्याविंचू", 'सातव्या मुलीची...'चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, "त्रिनयना देवी सध्या..."

छोट्या पडद्यावरील मालिका या  अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील पात्र, त्याची कथा ही आवडत असल्यास त्यावर मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही तर त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात.

अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका. मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला, जो काही प्रेक्षकांना आवडला, तर काहींना तो आवडला नाही. यामध्ये रुपालीला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले. यानंतर ती घरी येताच तिला संमोहन शक्ती प्राप्त झाली असल्याचे पाहायला मिळाले, या शक्तीने घरातील केतकी काकुला समोहित करते. याचा एक प्रोमोदेखील आला आहे आणि याच प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंग दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता झाल्यानंतर CCTV फुटेज समोर, फिरताना दिसला अन्…; नेमकं प्रकरण काय?

या नवीन प्रोमोमध्ये रुपाली केतकीच्या अंगावर बसली असून ती त्याला संमोहित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दृश्याची तुलना अनेक प्रेक्षकांनी झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचूशी केली आहे. अशा अनेक प्रतिक्रिया या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोखाली “तात्या विंचू आला, विरोचक आहे की तात्याविंचू. तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा बाहेर ओम फट्ट स्वाहा:, तात्याविंचूसारखा अभिनय कोणी करू शकत नाही’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात

तर काहींनी “ही मालिका बघून एखाद्याला वेड लागेल, बस्स झाले बंद करा आता भूतगिरीची मालिका, विरोचक केतकीला संमोहित करत आहे मग बाकीचे झोपले आहेत का, ही मालिका बघून ‘असंभव’ची आठवण आली, प्रेक्षक ज्या मालिका रोज न चुकता आवडीने पाहत होते त्या मालिकेची इतकी वाट लावून टाकली की आता ही मालिका पहावीशी वाटत नाही, बंद करा ही मालिका त्रिनयना देवी काहीच करत नाही”. अशा अनेक कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Dhanashree Bhalekar Mother Death

'नवरी मिळे हिटलरला'मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, दुःख अनावर, म्हणाली, "आई खूप एकटी पडलीय तुझ्याशिवाय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.