गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोच्या सगळ्या बॅग उचलून निघाला कुशल बद्रिके, फोटोही केला शेअर, म्हणाला, “भांडणात ही म्हणाली होती की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 27, 2024 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kushal badrike instagram post

बायकोच्या सगळ्या बॅग उचलून निघाला कुशल बद्रिके, फोटोही केला शेअर, म्हणाला, "भांडणात ही म्हणाली होती की..."

 झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचं अचूक टायमिंग, अभिनय यामुळे त्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. दहा वर्षांनी ‘चला हवा…’ या कार्यक्रमाने निरोप घेतला. त्यानंतर तो आता सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमामध्येही तो प्रेक्षकांचा खळखळवून हसवत आहे. तो टेलिव्हिजनबरोबरच सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (kushal badrike instagram post)

कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास हा खूपच खडतर होता. ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यावेळी त्याची बायको सुनयनाने त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये खूप साथ दिली होती. तो प्रत्येक मुलाखतीमध्ये तिचे नाव घेऊन कौतुक करत असतो. अशातच त्याने आता बायकोसाठी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याने त्याचा व बायकोचा फोटो शेअर केला असून त्यावरील कॅप्शनची चर्चा सर्वत्र होत आहे.

आणखी वाचा – “चेहऱ्यावर खूप पिंपल, ग्रामीण भाषा अन्…”, परभणीची भाकरी म्हणून अभिजीत खांडकेकरला हिणवायचे लोक, म्हणाला, “तो काळ फार वाईट…”

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात खूप साऱ्या बॅग असलेल्या दिसत आहेत. त्याची पत्नी पुढे चालत आहे आणि कुशल तीच्या मागे चालत आहे. सुनयनाच्या हातामध्ये कोणतीही बॅग पाहायला मिळत नाही आहे. यावरुन त्याने या फोटोला एक हटके कॅप्शन दिले आहे. ज्यामुळे या फोटोवर कुशलच्या अनेक चाहत्यांनी अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोला “मागे भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हीने एकटीनेच उचलला आहे म्हणून”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – “विरोचक की तात्याविंचू”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “त्रिनयना देवी सध्या…”

त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच एक नेटकरी म्हणाला की, “नवरा पण भारी देवा”, दुसरा नेटकरी लिहितो की, “घरातील विषय सार्वजनिक करु नका दादा…गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या”, तसेच अजून एक नेटकरी लिहितो की, “याला म्हणतात सर्वगुण संपन्न नवरा”.

दरम्यान कुशलच्या कामबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रांमध्ये काम करत आहे. तसेच त्याची पत्नी सुनयना ही कथ्थक डान्सर आहे.    

Tags: chala hawa yeu dyakushal badrikeSunayana Badrike
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial Sonali Kulkarni danced in AJ and Leela's mehndi ceremony.

AJ-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ‘अप्सरा’ची हवा, सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.