गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हसनचं ब्रेकअप, बॉयफ्रेंडपासून विभक्त झाल्यानंतर एकमेकांना केलं अनफॉलो

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2024 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shruti Haasan Breakup News

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हसनचं ब्रेकअप, बॉयफ्रेंडपासून विभक्त झाल्यानंतर एकमेकांना केलं अनफॉलो

अभिनेत्री श्रुती हासनने साऊथ सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर श्रुती अभिनयशिवाय बरेचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कित्येकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आलेली दिसली. मात्र आता श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काहीच बरोबर चालत नसल्याने चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकाबरोबर ब्रेकअप केले आहे. (Shruti Haasan Breakup News)

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, श्रुती हसन व तिचा प्रियकर शंतनू हजारिका यांनी त्यांचे अनेक वर्षांपासून असलेलं नातं तोडलं आहे आणि आता ते वेगळे झाले आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असल्याचंही समोर आलं. रिपोर्टनुसार, श्रुती व शंतनू यांच्यात काही वैयक्तिक समस्या होत्या ज्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. श्रुतीने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “हा एक विलक्षण प्रवास आहे, माझ्याबद्दल व लोकांबद्दल मी खूप काही शिकत आहे”.

आणखी वाचा – “कपडे बदलताना त्याने माझं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, “धमकी दिली आणि…”

View this post on Instagram

A post shared by Bollywood Color (@bollywood.color)

श्रुती व शंतनू खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि गेल्या काही वर्षांपासून ते लिव्हइन रिलेशनशिपमध्येही होते. अनेकदा दोघेही एकत्र दिसले आणि त्यावेळी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडली नाही. श्रुती एक अभिनेत्री आहे तर शंतनू एक प्रसिद्ध डूडल व कलाकार आहे. रफ्तार, दिव्य, ऋत्विजसह त्यांनी अनेक लोकप्रिय व्यक्तींबरोबर काम केले आहे.

आणखी वाचा – केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात

या वर्षाच्या सुरुवातीला, सोशल मीडिया सेन्सेशन ओरी उर्फ ​​ओरहान अवत्रमणीने शंतनूच्या लग्नाची अफवा पसरवली होती की तो श्रुतीचा पती आहे. तथापि, नंतर श्रुतीने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करुन स्पष्ट केले की, “प्रत्येक गोष्टीबद्दल मी खुलेपणाने बोलते मग मी हे का लपवू?, मी विवाहित नाही”. श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रुती शेवटची ‘सालार’मध्ये दिसली होती. या चित्रपटात प्रभास व पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. ‘सालार’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींहून अधिक कमाई केली होती.

Tags: entertainmentshruti haasanShruti Haasan Breakup Newsshruti haasan breakup with shantanu hazarika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo audience made negative comments

"विरोचक की तात्याविंचू", 'सातव्या मुलीची...'चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, "त्रिनयना देवी सध्या..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.