मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘नवरी मिळे हिटलरला’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, दुःख अनावर, म्हणाली, “आई खूप एकटी पडलीय तुझ्याशिवाय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2024 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dhanashree Bhalekar Mother Death

'नवरी मिळे हिटलरला'मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, दुःख अनावर, म्हणाली, "आई खूप एकटी पडलीय तुझ्याशिवाय…"

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेत एजे व लीला यांचा अनोखा प्रवास पाहायला मिळत आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असताना मालिकेतील एका अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मालिकेत फाल्गुनी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे. अभिनेत्री धनश्री भालेकरने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत धनश्री खूपच भावुक झालेली पाहायला मिळाली. (Dhanashree Bhalekar Mother Death)

धनश्रीची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेत्रीने आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. पण अखेर तिच्या आईची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. धनश्री भालेकरच्या आईचे १८ एप्रिलला निधन झाले. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “विरोचक की तात्याविंचू”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “त्रिनयना देवी सध्या…”

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Bhalekar | Actress (@ddhanashri_official)

धनश्रीने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आई. मी तुला खूप मिस करत आहे गं. आज ८ दिवस झाले पण मला अजूनही हे मान्यच करता येत नाही आहे की तू आमच्यात नाही आहेस. मला तुझी खूप गरज आहे. आई मी खूप एकटी पडले आहे. माझ्याशी बोलायला, शेअर करायला कोणीच नाही. मला तू हवी आहेस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुझं नसणं म्हणजे माझ्यामधील एक भाग वगळल्यासारखं आहे. माझ्या आयुष्यातील प्रेरणा हरवली आहे. तुझ्याशिवाय खूप अपूर्ण वाटत आहे. तुझं सगळं किती विशिष्ट आहे. मी तुझी पूर्णता आणि सुपर स्वच्छता खूप मिस करत आहे. मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे. मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू? अजूनही असं वाटत आहे की तू आहेस”.

आणखी वाचा – चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हसनचं ब्रेकअप, बॉयफ्रेंडपासून विभक्त झाल्यानंतर एकमेकांना केलं अनफॉलो

यापुढे तिने लिहिलं आहे की, “क्रिकेट मॅच बघताना खुश होशील, सगळ्या मालिकांच्या स्टोरी मला घरी आल्यावर सांगशील. किचनमधून माझा आवडता पदार्थ बनवून मी बाहेरुन घरी आल्यावर मला खायला देशील. घराबाहेर पडताना बाय करायला दाराबाहेर वा खिडकीत येशील. मला तुझी खुप आठवण येत आहे. तुझ्याशिवाय काय करावं मला सुचत नाही आहे. मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझं माझ्यावर लक्ष आहे. तुला दिलेल्या कमिटमेंट आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे. प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये. खूप खूप प्रेम. लव्ह यु आई”.

Tags: Dhanashree Bhalekar Mother Deathmarathi actressmarathi serialnavri mile hitler la
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
kushal badrike instagram post

बायकोच्या सगळ्या बॅग उचलून निघाला कुशल बद्रिके, फोटोही केला शेअर, म्हणाला, "भांडणात ही म्हणाली होती की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.