बॉलिवूडमधील कमालीची अभिनेत्री म्हणून शेफाली शहाचे नाव आवर्जून घेतलं जातं. १९९५ साली त्यांनी ‘ ‘रंगीला’ या चित्रपटातून अभिनय विश्वामध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रांमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र तिने अनेक चढ उतार पाहिले आहेत.शेफाली शाह सध्या चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्याबरोबर सुखाने आपले आयुष्य जगत आहे. त्यांना दोन मुलंही आहेत. पण विपुल हे त्यांचे दुसरे पती असून तिने पहिले लग्न टेलिव्हीजन व चित्रपट अभिनेते हर्ष छाया यांच्याबरोबर झाले होते. याबद्दल नुकतेच हर्ष यांनी शेफालीच्या नात्याबद्दल मन मोकळे केले आहे. त्यांच्यासाठी आता शेफालीचा विषय बंद झाल्याचेही सांगितले आहे. तसेच शेफाली यांनीही घटस्फोटावेळी परिस्थिति वाईट असल्याचेही सांगितले होते. (harsh chhaya on shefali shah)
शेफाली व हर्षने १९९४ मध्ये लग्न केले. पण सहा वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनीही ‘हसरते’ या मालिकेमध्ये एकत्रित काम केले होते. या मालिकेदरम्यान त्या दोघांमध्ये मैत्री झाली नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण दोघांच्या नात्याचा शेवट खूप वाईट झाला असेही समजले.
दोघांच्या घटस्फोटाबद्दल हर्षने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, “ ही गोष्ट खूप जुनी आहे. २० ते २५ वर्ष उलटून गेली आहेत. माझ्यासाठी हा विषय बंद झाला आहे. आम्ही अजिबात बोलत नाही. मला त्यांच्याशी बोलण्यात काही संशया नाही. पण आम्ही जेव्हा एकमेकांसमोर येऊ तेव्हा मात्र मी अवघडून जाईन”.
पुढे ते म्हणाले की, “आमचा अचानक घटस्फोट झाला नाही. काही महिन्यांपासून आमच्यामध्ये वाद सुरु झाले होते. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. आम्ही वेगळे झाल्यानंतर मला आश्चर्य वाटले नाही. आठ महिन्यांपासून आमच्यामध्ये ही परिस्थिति निर्माण झाली होती. आता मी या सर्व प्रकाराकडे व्यावहारीक स्वरूपात पाहतो. दोन व्यक्ती भेटल्या, प्रेम झाले, लग्न झाले आणि वेगळे झालो. यामध्ये कोणीही काहीही करु शकत नाही. त्यामुळे असे वाटते की असे नाते निभावण्यापेक्षा वेगळे झालेले बरे”.
याबाबत एकदा शेफाली यांनी दिलेल्या मुळखतीमध्येदेखील म्हंटले होते की, “त्या नात्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. मी खूप मेहनत घेतली. जोपर्यंत सर्व ठीक आहे तोपर्यंतच नातं व्यवस्थित आहे हे समजावं. प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने होईलच असे नाही”.
शेफाली नुकतीच ‘थ्री ऑफ अस’ या सिरिजमध्ये दिसून आली होती. यामधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही करण्यात आले होते.