गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याची जगण्याची इच्छाच नव्हती कारण…”, भावाच्या निधनाबाबत पहिल्यांदाच बोलला राहुल देव, म्हणाला, “खाणं-पिणं सोडलं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 18, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rahul dev talk about brother mukul dev

“त्याची जगण्याची इच्छाच नव्हती कारण...”, भावाच्या निधनाबाबत पहिल्यांदाच बोलला राहुल देव, म्हणाला, “खाणं-पिणं सोडलं आणि...”

सुप्रसिद्ध अभिनेता राहुल देवचा भाऊ मुकूल देवचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. मुकूलच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. सन ऑफ सरदार, यमला पगला दिवाना सारख्या चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवलं. कशिश, कुमकुम एक प्यार का बंधन, शशश… फिर कोई है यांसारख्या मालिकांमुळे तो घराघरांत पोहोचला. गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होता असं सतत बोललं जात होतं. आता या सगळ्या अफवांवर त्याचा भाऊ राहुलने सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच त्याचं निधन नक्की कशामुळे झालं याबाबत सांगितलं. (Rahul dev talk about brother mukul dev)

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राहुलने त्याच्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. तो म्हणाला, “तो आठ दिवस आयसीयुमध्ये होता. वैद्यकीय दृष्ट्या पाहिलं तर खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे हे सगळं झालं होतं. रुग्णालयामध्ये भरती होण्यापूर्वी चार, पाच दिवस त्याने जेवण वगैरे बंद केलं होतं. त्याला एकटं एकटं वाटत होतं. आयुष्य जगण्याची त्याची इच्छाच मरुन गेली होती. कित्येक प्रोजेक्ट्ससाठी त्याने समोरुन नकार दिला”.

आणखी वाचा – “माझ्यावर काळी जादू, मरणाची इच्छा अन्…”, प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेला सुप्रसिद्ध अभिनेता, दिलं सडेतोड उत्तर

View this post on Instagram

A post shared by Rahul Dev (@rahuldevofficial)

राहुल म्हणाला, “वडिलांची सेवा करण्यासाठी २०१९मध्ये तो दिल्लीला गेला. त्याच वर्षी वडिलांचं निधन झालं. आईचं २०२३मध्ये निधन झालं. त्यानंतर मुकुलने स्वतःला लिखाणामध्ये झोकून दिलं. तो एकटाच राहू लागला. त्याला त्याच्या मुलीचीही खूप आठवण यायची. तो स्वतःचीच काळजी घेत नव्हता”. मुकुल गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनचा सामना करत होता असं बऱ्याच रिपोर्ट्समध्ये नमुद करण्यात आलं. याबाबतही राहुलने स्पष्ट सांगितलं.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर तरी डॉक्टरांकडे मागितले तीन तास, म्हणाला…

तो म्हणाला, “जे लोक त्याच्या डिप्रेशनबाबत वगैरे बोलत आहेत ते त्याच्या संपर्कातही नव्हते. तो शारीरिकदृष्ट्या फिट नव्हता असंही अनेकांनी म्हटलं. पण हाफ मॅरेथॉनमध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्याचं वजन वाढलं होतं हे बरोबर आहे. कोणी स्वतःची काळजीच घेत नसेल तर असं होणारच. २०१९ ते २०२४ पर्यंत कोण त्याच्या संपर्कात होतं का?, तो कोणाला भेटायला तरी गेला का?, तो जेव्हा रुग्णालयात होता तेव्हा त्याच्यासाठी कोणी प्रार्थना केली का? हेही प्रश्न आहेत”. राहुलचं त्याच्या भावावर जीवापाड प्रेम होतं हे यामधून दिसूनही आलं. तसेच मुकुलबाबत सुरु असलेल्या अफवांचं सत्य त्याने सगळ्यांसमोर आणलं.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Aruna Irani talk about marriage

विवाहित दिग्दर्शकाबरोबर लग्न, मुलं होऊ दिली नाहीत कारण...; अरुणा इराणींचं वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य, घरी बसावं लागेल म्हणून...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.