सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विवाहित दिग्दर्शकाबरोबर लग्न, मुलं होऊ दिली नाहीत कारण…; अरुणा इराणींचं वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य, घरी बसावं लागेल म्हणून…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 18, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aruna Irani talk about marriage

विवाहित दिग्दर्शकाबरोबर लग्न, मुलं होऊ दिली नाहीत कारण...; अरुणा इराणींचं वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य, घरी बसावं लागेल म्हणून...

लग्न, काही वर्ष एकत्र राहणं आणि त्यानंतर घटस्फोट हे आता बी-टाऊनमध्ये अगदी सहज घडताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंडस्ट्रीतील घटस्फोटाच्या घटना बऱ्याच वाढल्या असल्याचं चित्र दिसलं. नातं, लग्न याबाबत काही कलाकार अगदी उघडपणे भाष्य करतात. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणीदेखील आहेत. अरुणा त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याचदा स्पष्टपणे बोलताना दिसतात. आताही त्यांनी लग्न, नाती, मुल न होऊ देण्याचा निर्णय याबाबत भाष्य केलं. त्यांनी आई न होण्याचा निर्णय का घेतला नाही? याविषयी उघडपणे सांगितलं. (Aruna Irani talk about marriage)

अरुणा सुप्रसिद्ध कॉमेडियन महमूद यांच्या प्रेमात होत्या. मात्र महमूद यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीला अरुणा यांच्याबाबत कळताच त्यांना हे नातं नको होतं. महमूद यांनी अरुणा यांच्याबरोबर काम करु नये अशी पत्नीची इच्छा होती. महमूद यांनी आपल्याशी लग्न करावं अशी अरुणा यांची इच्छा होती. मात्र तसं काहीचं घडलं नाही. परिणामी अरुणा व महमूद यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

आणखी वाचा – “त्याची जगण्याची इच्छाच नव्हती कारण…”, भावाच्या निधनाबाबत पहिल्यांदाच बोलला राहुल देव, म्हणाला, “खाणं-पिणं सोडलं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

महमदू यांच्याबरोबरचं नातं संपलं. त्यानंतर अरुणा व सुप्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. कुकू यांचंही आधीच लग्न झालं होतं. मात्र तरीही अरुणा यांच्याशी त्यांनी १९९०मध्ये लग्न केलं. पुन्हा लग्न झालेल्या व्यक्तीवरच तुम्ही प्रेम कसं केलं? असा प्रश्न नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “कधी कधी माणूस एकटाच पडतो. मग अशा परिस्थिती दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर त्याचं जमतं. प्रेम होतं. अशावेळी फक्त त्या वेळेचं सुख दिसतं. मात्र भविष्यातील दुःख मात्र दिसत नाही”.

आणखी वाचा – “माझ्यावर काळी जादू, मरणाची इच्छा अन्…”, प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेला सुप्रसिद्ध अभिनेता, दिलं सडेतोड उत्तर

कुकू यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचाही अरुणा यांनी विचार केला. कुकू त्यांच्या कुटुंबाबरोबर सुखी राहावे म्हणून त्यांनी हा विचार केला होता. मात्र कुकू यांनीच अरुणा यांना स्वतःपासून लांब जाऊ दिलं नाही. कुकू यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर आई न होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याचविषयी त्या म्हणाल्या, “जर मी आई होण्याचा निर्णय घेतला असता तरी मला घरी बसावं लागलं असतं. घरातील नोकराला मुल सांभाळायला द्यायचं या मताची मी नव्हते. मुल नसूनही मी खूश आहे. माझ्या मुलांनी समाजाचं बोलणं ऐकावं, एकटेपणा सहन करावा, त्रास सहन करावा असं मला अजिबात वाटत नव्हतं”. अरुणा यांनी अगदी खुलेपणाने त्यांचे विचार मांडले.

Tags: aruna iranibollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
amol bawdekar heart attack

हार्ट अटॅकनंतर अमोल बावडेकर यांचा रुग्णालयातील फोटो समोर, अभिनेत्याची प्रकृती स्थिर, कलाकार मित्राने दिली तब्येतीबाबत अपडेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.