सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर तरी डॉक्टरांकडे मागितले तीन तास, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2025 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
amol bawdekar heart attack

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर तरी डॉक्टरांकडे मागितले तीन तास, म्हणाला…

amol bawdekar heart attack : अभिनयासाठी कलाकार हा नेहमीच तत्पर असतो. एखादा शो करताना तो त्याचे वैयक्तिक अडथळे विसरुन अभिनयाला प्राधान्य देत काम करतो. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या कठीण काळाला बाजूला ठेवून सिनेसृष्टीत नेहमीच मनोरंजनासाठी पुढाकार घेतला. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी रद्द करावा लागला. मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात हा प्रयोग होणार होता.

अमोल बावडेकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र प्रकृती ठीक नसतानाही प्रयोग करु देण्याची बावडेकर यांनी विनंती डॉक्टरांना केली. यावरुन त्यांची अभिनयाबाबतची चिकाटी पाहायला मिळतेय. अमोल यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहामध्ये होणारा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले.

आणखी वाचा – Video : नवऱ्याने प्रियांका चोप्राच्या बहिणीचा हात पकडताच अंकिता लोखंडे भडकली, कॅमेऱ्यासमोरच रागाने पाहिलं अन्…

अमोल यांच्या जागी आता अभिनेता अनिरुद्ध जोशी ही भूमिका साकारणार आहे. लवकरच तालमी करुन नाटकाच्या पुढच्या प्रयोगात तो दिसेल, अशी माहिती दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. “कुठून कुठून येतं हे स्पिरीट? कोण देतं हे बळ? देवाच्या कृपेने आणि रसिकांच्या आशीर्वादाने अमोल आता बरा आहे, लवकरच रंगभूमीवर रुजू होईल”, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ९३ व्या वर्षी बायकोसाठी दागिना खरेदी करणारे आजोबा, सोनाराच्या दुकानात शिरताच…; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

‘महाराष्ट्र टाईम्स’शी साधलेल्या संवादात दिग्दर्शक राजेश देशपांडे म्हणाले की, “डॉक्टरांनी अमोल यांची प्रकृती तपासल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याही परिस्थितीत अमोल यांनी डॉक्टरांना विनंती केली, की मला केवळ तीन तासांचा वेळ द्या. मी नाटकाचा प्रयोग पूर्ण करुन येतो. अर्थात, डॉक्टरांनी तशी परवानगी दिली नाही. प्रकृती गंभीर असताना नाटकाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली हे कौतुकास्पद आहे”.

Tags: amol bawdekarHeart Attackmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Celebrity visit to premanand maharaj

“माझ्यावर काळी जादू, मरणाची इच्छा अन्...”, प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेला सुप्रसिद्ध अभिनेता, दिलं सडेतोड उत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.