‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता ओंकार राऊत घराघरात पोहोचला. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून ओंकारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता मात्र ओंकारच्या लोकप्रियतेचं अजून एक कारण सध्या चर्चेत आहे ते म्हणजे ओंकार आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेत असलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या अफेअरची. (onkar raut priydarshini indalkar)
अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या वेळी हास्यजत्रेतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ओंकार राऊत आणि प्रियदर्शिनी इंदलकरही उपस्थित होते. ओंकार राऊतसोबत प्रियदर्शिनीने एक फोटो शेअर केला, यात प्रियदर्शनी आणि ओंकार याच्या हटके पोजमुळे सोशल मीडियावर चांगलीच रंगली, प्रियदर्शनीने ओंकारच्या छातीवर हात ठेवून हा फोटो काढला होता त्यामुळे या फोटोवरुन अनेक चाहत्यांनी प्रियदर्शिनी ओंकारमध्ये नेमकं काय अस विचारलं होत.
पहा ओंकार काय म्हणाला प्रियदर्शनीला (onkar raut priydarshini indalkar)

आता या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळत होताच इतक्यातच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या एका प्रोमोने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे, या प्रोमो मध्ये ते एका स्किट दरम्यान प्रियदर्शिनी आणि ओंकार एकच ऑफिसमध्ये असतात असं दिसतंय, त्यावेळी प्रियदर्शिनी सांगते मी इथे ऑफ चेहऱ्याने बसलेली असते तेव्हा कि असा येत जात असा खळीवरती कमेटी करत असतो, यावर इशा डे विचारते काल काय म्हणाला होता ग, यावर प्रियदर्शिनी ओंकारला विचारते काल काय म्हणाला होता, तेव्हा ओंकार म्हणतो, काल मी म्हणालो होतो, प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का? यावर सगळेच जण हसू लागतात. ओंकार आणि प्रिदर्शनीच्या या स्कीटने पुन्हा एकदा त्यांच्यातल्या अफेअरची चर्चा रंगेल. (onkar raut priydarshini indalkar)
महाराष्ट्राची हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकार हा आपल्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यांची प्रत्येक स्किट ही प्रेक्षक उचलून धरतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत.
