मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी-नीरजची लगीनघाई, तर श्रीनू-ओवीही घेणार सात फेरे, मालिकेत येणार का नवं वळण?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 26, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saara kahi tichyasathi new twist shrinu and ovi love story nishi niraj wedding

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी-नीरजची लगीनघाई, तर श्रीनू-ओवीही घेणार सात फेरे, मालिकेत येणार का नवं वळण?

छोट्या पडद्यावरील नव्यानेच सुरु झालेली ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या आवडीची मालिका झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले. दोन बहिणींच्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आता त्यांच्या मुलींच्या आयुष्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या दादा खोतांची लेक निशी व नीरजच्या यांच्या लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे. आपलं प्रेम ज्याच्यावर जडलं त्या नीरजबरोबर निशी आता विवाहबंधनात अडकणार असल्याने ती आता प्रचंड आनंदात आहे. नुकतंच या दोघांच्या लग्नाचा प्रोमो समोर आला असून यात हे दोघे सप्तपदी घेतानाचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर नुकत्याच आलेल्या या प्रोमोमध्ये निशी व निरज एकमेकांबरोबर सप्तपदी घेत असतानाच श्रीनिवास व ओवी हे देखील त्यांच्या मागेमाग एकमेकांचा हात धरून चालतानाचे पाहायला मितल आहे. सप्तपदीचे शूटिंग करत असताना श्रीनिवासचा तोल जातो, तेवढ्यात ओवी त्याचा हात हातात घेत त्याला सावरते आणि मग ते दोघेही सप्तपदी घेत असलेल्या निशी-नीरजच्या मागे हातात हात घालून चालतानाचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – शाल्व किंजवडेकरची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात, बायकोबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला, “मुहूर्त…” 

श्रीनूच्या लग्नाचा विचार खोत कुटुंब करत आहे आणि श्रीनुची वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहे. पण, श्रीनुच्या हृदयात ओवी आहे ह्याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. बालपणीच्या मैत्रीतल्या प्रेमाला श्रीनू साद देईल अशी आशा चारूला आहे. चारू ही आत्या मंजूशी बोलताना सतत श्रीनूचा उल्लेख करत आहे तर, चारूनेच श्रीनूबरोबर लग्न करावे असा मंजूलादेखील वाटत आहे. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. तर, लालीदेखील चारुला सून करण्यासाठी आणि श्रीनूच्या मनात तिला भरण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे.  

आणखी वाचा – Video : सुप्रासिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडपं लग्नबंधनात, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सासऱ्यांनीचं सजवला बेडरूम, थेट व्हिडीओच केला शेअर

अशातच निशी-नीरज यांच्या लग्नातील श्रीनू व ओवी यांच्या हातात हात घालून जाण्याने उमाला वेगळाच आनंद होत आहे. त्यामुळे मालिकेत आता श्रीनू व ओवी यांचे लग्न होताना पाहायला मिळेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, खूप काळानंतर घरात एक मंगलकार्य पार पडत आहे  म्हणून  सगळे आनंदात आहेत. 

Tags: marathi entertainment newsmarathi serialSaara Kahi Tichyasathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Preamachi Gosht Serial Promo

सागरने केली मुक्ताची निर्दोष सुटका, पुराव्यानिशी कार्तिकचा खरा चेहरा आणला सर्वांसमोर अन्…; कार्तिकला शिक्षा होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.