बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेण्याची विरोचकाकडे शक्ती, केतकीला स्वत:च्या बाजूने करुन घेतल्यानंतर इतरांच्या जीवाला धोका

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 26, 2024 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist Virochka hypnotizing Ketki

दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेण्याची विरोचकाकडे शक्ती, केतकीला स्वत:च्या बाजूने करुन घेतल्यानंतर इतरांच्या जीवाला धोका

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका गेली काही दिवस अनेक ट्विस्ट्समुळे चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत गेले काही दिवस एकामागून एक अनेक रहस्यमय ट्विस्ट येत असल्याने ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. रहस्यमय कथानक, नवनवीन ट्विस्ट्स व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने छोट्या पडद्यावरील या मालिकेने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत अस्तिकाच्या अंतानंतर नुकताच रुपालीचादेखील अंत झाला असल्याचे पाहायला मिळालं.

अद्वैतला वाचवताना नेत्रा विरोचकाचा वध करते. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. यानंतर विरोचकाला संमोहन शक्तीदेखील मिळाली आहे. ज्याचा विरोचक राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. नुकतंच मालिकेत विरोचकाने केतकी राजाध्यक्षला संमोहित केल्यामुळे ती स्वत:वर चाकू उगारत असल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी-नीरजची लगीनघाई, तर श्रीनू-ओवीही घेणार सात फेरे, मालिकेत येणार का नवं वळण?

अशातच नुकत्याच आलेल्या एका नवीन प्रोमोमध्ये विरोचक केतकीच्या अंगावर बसला असून ती त्याला संमोहित करत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि केतकीच्या शरीराचा वापर करुन विरोचक संपूर्ण कुटुंबाला त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. केतकी राजाध्यक्षला संमोहित केल्यामुळे ती स्वत:वर चाकू उगारत आहे. त्यामुळे तिला वाचवायला जाताना ती राजाध्यक्ष कुटुंबीयांना जवळ न येण्याची धमकीही देते.

आणखी वाचा – तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला २ महीने पूर्ण होताच बहीणीने दिल्या हटके शुभेच्छा, खुशबूने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “मी नेहमीच…”

या व्हिडीओमध्ये विरोचक केतकीच्या अंगावर बसून तिला “आता विरोचक बोलणार तेच घडणार. तुझा आत्मा, तुझा शरीर, तुझा मेंदू, आता या विरोचकाच्या ताब्यात आहे” असं म्हणते. तसेच या व्हिडीओद्वारे विरोचक अधिकच ताकदवार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता विरोचकांच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा-इंद्राणीसह राजाध्यक्ष कुटुंबीय कसे लढणार?, नेत्रा स्वत” विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कशी लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Onkar Gowardhan New Entry

'आई कुठे…' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आशुतोष केळकर नेमकं काय करतो?, सध्या करत आहे 'हे' काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.