एखादी अभिनेत्री किंवा एखादा अभिनेता जेव्हा कोणत्या विशेष पात्रामुळे प्रेक्षकांच्या चिरकाळ लक्षात राहतात तेव्हा त्यांच्या नवीन भूमिका स्वीकारणं प्रेक्षकांना जास्त जड जात नाही. नेमकं हेच घडलंय अभिनेत्री जुई गडकरीहिच्या बाबत. पुढचं पाऊल या स्टार प्रवाहावरच्या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री जुई महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
जुई गडकरीच्या त्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्या मालिकेच्या यशा नंतर जुई ने नव्याने पदार्पण केलेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेचेही १०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत.(Sayli Arjun Accident)
या निम्मित इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत जुईने ठरलं तर मग मालिकेच्या शूटिंग दरम्यान झालेल्या एका छोट्या अक्सिंडेंटचा किस्सा शेअर केला आहे. जुई आणि अमित हे दोघं या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. एकदा शूटिंग दरम्यान एकमेकांना डोकं धडकवण्याचा सीन त्यांना करायचा होता अर्थातच हा सीन दाखवण्यासाठी त्यांना हलकेच डोकं धडकवायचं होत पण नकळत पणे ते डोकं एकदम जोरात धडकलं गेलं आणि जोरात आवाज झाला दोघानांही गंभीर दुखापत झाली असणार असा भास संपूर्ण सेट वर निर्माण झाला परंतु सुदैवाने दोघांना ही जास्त दुखापत झाली नाही आणि तो सीन पुढे कंटिन्यू झाला. जुई ने सांगितलं कि त्या प्रकार दरम्यान झालेल्या आवाजाने मात्र तो सीन कायमचा लक्षात ठेवण्या सारखा बनवला.(Sayli Arjun Accident)
पुढे जुईने सांगितली की अशा घटना अधून मधून घडत राहतात आणि हसत खेळत शूट चालू असत. तसेच जुई आणि अमित ने १०० भाग पूर्ण झाल्याचे श्रेय प्रेक्षकांना देत प्रेक्षकांचे आभार मानले आणि असच प्रेम करत राहण्याचं आवाहन देखील प्रेक्षकांना केले. स्टार प्रवाह वरील सर्व जोड्यांमध्ये सायली आणि अर्जुन ही जोडी आता प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. सोशल मीडिया वर हे या दोघांचे फॅन क्लब फॅन्सकडून क्रिएट केले गेले आहेत.तर मालिकेच्या १०० भागांच्या सेलेब्रेशन निम्मित मालिकेच्या दिगदर्शकानी सुद्धा सर्व पात्रांबद्दल मजेशीर माहिती शेअर केली आहे.
हे देखील वाचा –‘तुझं माझं नेटवर्क गं!!’ऋतुजाचे बोल्ड फोटो पाहून ओंकार राऊतने केलं फ्लर्ट,चाहते झाले चकित