मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.अनन्या या नाटकातून तिने मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. नांदा सौख्य भरे’, चंद्र आहे साक्षीला अशा कितीतरी मालिकांमध्ये सालस, समंजस मुलीची भूमिकसाकारणारी ऋतुजा खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. ती शेअर करत असलेल्या फोटोवरुन वेळोवेळी याचा प्रत्यय चाहत्यांना येत आहे.ऋतुजा ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.ती नेहमी तिचे बोल्ड अंदाजात फोटो शेअर करते.नुकतंच तिने शेअर केलेले फोटोपाहून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊतची विकेट पडली.(Rutuja Bagwe)

अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकतंच एक फोटोशूट केलं. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेत.या फोटोत तिने लाल रंगाच्या सिव्हलेस आणि ओपन थाय गाऊन परिधान केला, यात ती फारच हॉट दिसते.तसेच या ड्रेसवर तिने नाजूक नेकलेस देखील घातलाय. विशेष म्हणजे ती या फोटोंनमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे. तर तिचे हे फोटो पाहून अनेक चाहते हे घायाळ झालेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. पण यात लक्षवेधी ठरतेय ओंकार राऊतची कमेंटस, ऋतुजाच्या या पोस्टवर hey sexy you !! अशी कॉमेंट केली.
हे देखील वाचा- माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या सीनची तुलना करणं नेटफ्लिक्सला पडलं महागात! बिग बँग थेअरी मधील ‘तो’ भाग डिलीट
तर याला ऋतुजाने हा हा थँक यू. असं उत्तर दिल, पण ही कमेंट तिने दोनदा केली आहे.तर यावर ओंकारने तिची मस्करी करत तिच्यासोबत पुढे फ्लर्ट केलं आहे. तो म्हणाला, ‘दोन वेळा थँक यू बोललीस त्याबदद्ल दोन वेळा वेलकम’. या कमेंटवर ऋतुजा म्हणाली, ‘मग नेटवर्कलाही म्हण’.तो म्हणाला, ‘तुझं माझं नेटवर्क गं!!’ यावर ऋतुजा म्हणाली, ‘सर्व्हर डाऊन आहे.’ तर ओंकार म्हणाला, ‘असलेला सर्व्हरही बरी रेंज देतंय ग!!’ यानंतर ऋतुजाने मात्र हार मानली आणि म्हणाली,’तु जिंकलास’. तर असा हा त्यांच्यातील संवाद आणि ओंकारची कमेंट पाहून चाहत्यांनी भुवया उंचावल्यात.(Rutuja Bagwe)
काही दिवसांपूर्वी ओंकार राऊत आणि विनोदी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांचा एक फोटो व्हायरल झाला. तेव्हापासून त्यांच्यात काही तरी शिजतंय अश्या चर्चांना उधाण आलं. पण आता ओंकार देखील ऋतुजाचा हा बोल्ड अंदाज पाहून घायाळ झालाय.