बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला २ महीने पूर्ण होताच बहिणीने दिल्या हटके शुभेच्छा, खुशबूने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “मी नेहमीच…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 27, 2024 | 10:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Khushboo Tawde shared video and wished to Titeeksha and Siddharth on the occasion of their 2 month wedding anniversary

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला २ महीने पूर्ण होताच बहिणीने दिल्या हटके शुभेच्छा, खुशबूने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “मी नेहमीच...”

झी मराठी वहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडे ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधली. या विवाहाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या लग्नातील खास लूकचीही बरीच चर्चा रंगली होती.

आपल्या बहिणीच्या लग्नात अभिनेत्री खुशबू तावडे करवलीप्रमाणे मिरवली होती. मोठी बहीण असून खुशबूने तितीक्षाच्या लग्नात आईप्रमाणे जबाबदारी घेतली असल्याचे पाहायला मिळालं. अशातच आज आज तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. बहिणीच्या लग्नाला दोन महीने पूर्ण झाल्यामुळे खुशबूने दोघांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. खुशबूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तितीक्षाच्या डोक्याला मुंडावळ्या बांधताना दिसत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये दोघी बहिणींचा खास बॉण्डदेखील दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by ख़ुशबू (@khushbootawdeofficial)

आणखी वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी-नीरजची लगीनघाई, तर श्रीनू-ओवीही घेणार सात फेरे, मालिकेत येणार का नवं वळण?

“काही जण आपल्या मौल्यवान व आनंदी क्षणांमध्ये कायमच डोकावत असतात. तशी मी तुझ्या पाठीशी नेहमीच असेन. नेहमी आणि कायम. लग्नाला दोन महीने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तितीक्षा व सिद्धार्थ तुम्हा दोघांना खास शुभेच्छा” असं म्हणत खुशबूने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असून खुशबुने गडद गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे, तर तितीक्षाने पेस्टल रंगाची साडी परिधान केली आहे.   

आणखी वाचा – सागरने केली मुक्ताची निर्दोष सुटका, पुराव्यानिशी कार्तिकचा खरा चेहरा आणला सर्वांसमोर अन्…; कार्तिकला शिक्षा होणार का?

खुशबू-तितीक्षा या मनोरंजन सृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्री असून त्या दोघी उत्तम बहिणीदेखील आहे. त्यामुळे या दोघींचा खास बॉण्ड नेहमीच पाहायला मिळाला आहे. दरम्यान, खुशबू झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. तर, बहिण तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Tags: khushboo tawdemarathi entertainment newsTiteeksha Siddharth Marriage Newstiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist Virochka hypnotizing Ketki

दुसऱ्याच्या शरीराचा ताबा घेण्याची विरोचकाकडे शक्ती, केतकीला स्वत:च्या बाजूने करुन घेतल्यानंतर इतरांच्या जीवाला धोका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.