मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘बिग बॉस’ला माझं मानधन परवडलं नाही म्हणून…”, नवज्योत सिंह सिद्धू यांचं वक्तव्य, चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
navjot singh sidhu comeback

“‘बिग बॉस’ला माझं मानधन परवडलं नाही म्हणून...”, नवज्योत सिंह सिद्धू यांचं वक्तव्य, चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी...

‘द ग्रेट इंडियन कपिश शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता या शोमध्ये पुन्हा एकदा नवज्योत सिंह सिद्धू यांच्या हसण्याचा आवाज प्रेक्षकांना ऐकू येणार आहे. अर्चना पूरण सिंह यांच्याबरोबर नवज्योत शोच्या परीक्षक पदी बसणार आहेत. या शोच्यानिमित्ताने पुन्हा एकदा ते कलाक्षेत्रात कमबॅक करत आहेत. त्यांनी नुकताच एक व्लॉगही शेअर केला. या व्लॉगद्वारे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य वारे त्यांनी अनेक विषाही शेर ा केलं. ‘बिग बॉस ६’मध्ये ते २०१२साली सहभागी झाले. मात्र एका महिन्यातच ते शोमधून बाहेर आले. या शोला मानधन परवडलं नसल्याचा दावा नवज्योत यांनी केला आहे. ते नेमकं काय काय म्हणाले? हे सविस्तर जाणून घेऊया. (navjot singh sidhu comeback)

नवज्योस सिंग सिद्धू यांनी त्यांच्या युट्युब व्लॉगमध्ये काही खुलासे केले. त्यांनी ‘बिग बॉस ६’मध्ये सहभागी होण्याबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, “’बिग बॉस’मध्ये जाऊन लोक त्यांची प्रतिमा खराब केल्याशिवाय पुन्हा परत येत नाहीत. पण या सगळ्याचा मी स्वीकार केला. कारण मला अमृतसरमध्ये स्वतःचं घर तयार करायचं होतं. त्यासाठी मला पैशांची गरज होती. राजकारणी व्यक्ती म्हणून मी जे कमावतो त्यामधून माझं घर तयार झालं नसतं. ‘बिग बॉस’ माझ्यासाठी पैसे कमावण्याचं एक माध्यम होतं. त्यांच्याजवळ खूप चांगल्या ऑफर होत्या”.

आणखी वाचा – Video : अनेख जखमी, लाखोंचं नुकसान अन्…; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Navjot Singh Sidhu (@navjotsinghsidhu)

“पहिल्या महिन्याची, नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याची माझी फी मी त्यांना सांगितली. माझं मानधन पाहता ते मला फक्त एका महिन्यासाठीच ठेऊ शकत होते. त्या एका महिन्यामध्ये मी घरात कोणालाही काहीच उलट बोललो नाही. माझ्या प्रतिमेला धक्का न लावता मी त्या घरातून बाहेर पडलो. या शोमुळे माझ्यासाठी अनेक दरवाजे खुले झाले”. स्पोर्ट्समध्येही एक कमेंटेटर म्हणून त्यांना कामासाठी विचारण्यात आलं. त्यानंतर कपिल शर्माच्या शोसाठी जज म्हणून काम करण्याची संधी त्यांना चालून आली. याबाबतही नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाष्य केलं.

आणखी वाचा – लग्नाच्या एका आठवड्यानंतर हिना खानने गाठलं रुग्णालय, हनिमूनदरम्यानच बिघडली तब्येत, म्हणाली, “खूप दुखतंय…”

नवज्योत सिंह सिद्धी म्हणाले, “कपिल शर्मा शोमध्ये आल्यानंतर मला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर कॉमेडी सर्कस शोसाठी मला बोलवण्यात आलं. त्यापूर्वी माझी स्वतःची अशी ओळख नव्हती. कपिल शर्मा माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, पाजी तुम्ही माझ्या शोमध्ये काम करण्यास तयार असलात तरच मला स्वतंत्र्य शो करण्याची चॅनल परवानगी देईल. राज नायक तेव्हा कलर्स वाहिनीचे प्रमुख होते. त्यांना मी कपिलच्या शोमध्ये जज म्हणून हवा होतो. चॅनलची टीआरपी वाढवण्यासाठी मी त्या शोमध्ये त्यांना हवा होतो. आम्ही सगळे नाश्तासाठी भेटलो आणि शो करण्यास मी होकार दिला”. आता पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये नवज्योत अर्चना पुरण सिंह यांच्याबरोबर परीक्षक म्हणून दिसणार आहेत.

Tags: bollywood newsentertainment newsnavjot singh siddhu
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
CID Dr Salunkhe Narendra Gupta EXIT

CID मधून डॉक्टर साळुंखेंची एक्झिट?, नरेंद्र गुप्तांना शोमधून काढण्यावरुन प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “आम्हाला मान्य नाही”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.