शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding

"मला माझा संसार हवाय", राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, "मी बॉलिवूड सोडेन"

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. आता या पर्वाचा फिनाले वीक सुरु आहे. यंदाच्या या सीझनचा विजेता कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच फिनाले वीकमध्ये जाण्याआधीच राखी सावंतच्या एक्झिटने अनेकांना नाराज केले. ‘बिग बॉस’च्या घरात असताना राखी आणि राकेश बापटचे अनोखे बॉण्डिंग पाहायला मिळाले. राखी राकेशच्या प्रेमात पडली याबाबत तिने टेलिव्हिजनवर खुलेआम सांगितले. याने अनेकांच्या नजरा त्यांच्या नात्याकडे लागून होत्या. मात्र, राकेशने राखीच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. आणि म्हणूनच राखीच राकेशवर एकतर्फी प्रेम आहे. ‘बिग बॉस’च्या घरात राखी राकेशच्या जवळ दिसली. वेळोवेळी ती राकेशच्या मागेपुढे करताना दिसली. इतकंच नाहीतर ती राकेशची बरेचदा काळजी घेतानाही दिसली. अशीही राखी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राकेश बापट बरोबरच्या नात्याबाबत स्पष्टच बोलली.

राखीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या Behind The fame या Podcast ला हजेरी लावली. यावेळी तिने राकेशबरोबरच्या नात्याबाबत स्पष्टपणे म्हटलं, “मला प्रेम करायचं आहे. खरंच मला असं वाटतं की, मला प्रेम हवंय, नवरा हवाय. मी घरात एकटीच राहते. एकटी झोपते, ऐकतो बाहेर जाते. कोणाचा तरी फोन मला यायला हवा. मला माझ्या नवऱ्याचा फोन यायला हवा जेवलीस का?, अगं कधी घरी येणार?, वाट बघतोय. मलापण माझ्या नवऱ्याला रोज टिफिन द्यायचा आहे. तो ऑफिसला जाणार त्याला टिफिन द्यायचा आहे. त्याची काळजी घ्यायची आहे. मला माझा संसार हवा आहे. पण असे नवरे नको जे त्यांच्या बायका-मुलांना सोडून माझ्याजवळ येणार. असे नवरे मला नको आहेत. म्हणून मी बापटला पसंत केला. की त्याचा आधीच घटस्फोट झाला आहे. तरुण मुलगा तर मला बिलकुल नको आहे. मला असा मुलगा हवा ज्याचं लग्न मोडलेलं आहे. आणि पहिल्यांदा तो खड्ड्यात पडून आलेला आहे. पण राकेश हा mummas boy आहे. तो फक्त आई आणि बहिणीचंच ऐकणार. माझं नाही ऐकणार. मी जीव जरी दिला त्याच्यासाठी तरी तो नाही ऐकणार. त्याची मम्मी आणि बहीण मला स्वीकारणार नाहीत”.

आणखी वाचा – Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

पुढे ती म्हणाली, “ते लोक ब्राह्मण कुटुंबातून आहेत. त्याच्यासाठी तर मी नॉनव्हेजपण सोडायला तयार आहे. पण राकेश तर नॉनव्हेज खातो. त्याने मला सांगितलं तो बॉलिवूड सोडणार. आईची शपथ मी सांगते मी सगळं सोडणार त्यांच्यासाठी. बॉलिवूडपण सोडणार. फक्त तू हो तर म्हण. कधी मी ‘बिग बॉस’समोर नाही जाणार. कधी मीडियाच्या समोर जाणार नाही. मी भरपूर केलंय. पण आता मला माझा संसार हवा आहे. नकोय काही मला. माझं एकावरच मनं जडलंय. आवडतोस तू. तू जेंटलमॅन आहेस. तू चांगला माणूस आहेस. आई-बाबा येतात आणि देवाघरी जातात. मला तुझी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तुझी रिद्धी ही बायको आहे. पण तीसुद्धा एकदा दुसऱ्यासोबत लग्न करणारच आहे. तू काय एकटा राहणार आहेस का?, माझं पण तर वय झालंच आहे यार. मी पण एकटी, तू पण एकटा. त्याचं कोणीतरी आहे, म्हणजे असेल म्हणून त्याने मला नाही सांगितलं. अशी भरपूर लोक या जगात आहेत, जे एकतर्फी प्रेम करतात. सफल होत नाहीत. पण मी प्रयत्न करत राहणार आहे. मी आतमध्ये भरपूर प्रयत्न केले. कधी कधी मला असं वाटतं की मला वेड लागलं आहे”.

Tags: bigg boss marathirakhi sawantraqesh bapat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Reasons For Sugar Cravings 

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.