सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अनेक जखमी, लाखोंचं नुकसान अन्…; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2025 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
flood on raam charan film set

Video : अनेख जखमी, लाखोंचं नुकसान अन्...; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

‘द इंडिया हाऊस’ चित्रपटामधून साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता राम चरण निर्मिती क्षेत्राकडे वळला आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘द इंडिया हाऊस’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. मात्र चित्रीकरणादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. सेटवर पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं चित्र व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. हे दृश्य व्हिडीओमध्येच अधिक भयावह दिसत आहे. शूटसाठी उपस्थित असलेल्या क्रु मेंबर्स, कलाकारांची परिस्थिती नेमकी कशी असेल? याचा अंदाजही लावता न येणारा आहे. (flood on raam charan film set)

सेटवर असलेली पाण्याची मोठी टाकी फुटली. त्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगाने होता की, सेटचं बरंच नुकसान झालं. सगळ्या वस्तूही वाहून गेल्या. इतकंच काय तर सेटवर उपस्थित अनेक लोक जखमी झाले असल्याचीही माहिती समोर येत आहे. सहाय्यक कोरियोग्राफर आणि इतर काही क्रु मेंबर्स जखमी झाले असल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

आणखी वाचा – मित्रानेच फसवलं, आयुष्यभराची कमाई गेली अन्…; मालिकांमध्ये काम करणाऱ्या जोडप्याचे रडून हाल, आता परिस्थिती अशी की…

హీరో నిఖిల్ సినిమా షూటింగ్లో భారీ ప్రమాదం

ది ఇండియన్ హౌస్ సినిమా షూటింగ్లో ఘటన

శంషాబాద్ సమీపంలో సముద్రం సీన్స్ తీసేందుకు ఏర్పాటు చేసిన భారీ వాటర్ ట్యాంక్ పగిలిపోవడంతో లొకేషన్ మొత్తం వరద

అసిస్టెంట్ కెమెరామెన్ కు తీవ్ర గాయాలు.. మరికొంత మందికి గాయాలు https://t.co/x98xY5eaKE pic.twitter.com/yLewxQTiQ7

— Telugu Scribe (@TeluguScribe) June 11, 2025

पूर परिस्थिती निर्माण होताच सेटवर धावाधाव सुरु झाली. अचानक पाणी आल्याने सेटवर काम करणारी माणसंही एकाच जागी अडकून राहिले. तरीही बरंच सामान सावरण्याचा क्रु मेंबर्सने प्रयत्न केला. सगळ्यांरु मेंबर्सने प्रयत्न केला. त्यानी एकत्र मिळून केलेले प्रयत्नही व्हिडीओमध्ये दिसत आहेत. सेटवरील जखमी काही मंडळींना उपचारासाठी लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा – दीपिका कक्करच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नणंदेने केला लेकाचा बारसा, झलक दाखवत नावही सांगितलं

सेटवर जेव्ही ही घटना घडली तेव्हा राम चरणही तिथे होता का? याबाबत कोणतीच अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. दरम्यान झालेलं नुकसान, जखमी क्रु मेंबर्स आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. सध्या या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कॅमेरा व इतर सामान वाहून जाऊ नये म्हणून क्रु मेंबर्स धावपळ करताना दिसत आहेत. राम चरणची पहिलीच निर्मिती असलेल्या या चित्रपटाला गालबोट लागलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsram charan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
navjot singh sidhu comeback

“‘बिग बॉस’ला माझं मानधन परवडलं नाही म्हणून...”, नवज्योत सिंह सिद्धू यांचं वक्तव्य, चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.