Hina Khan In Pain : हिना खानने गुप्तपणे लग्न करुन सर्वांनाच धक्का दिला. तिने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल यांच्याशी नोंदणीकृत पद्धतीने विवाह नोंदविला. १३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याचे लग्न झाले. लग्नाचे फोटो शेअर करुन हिनाने सर्वांना धक्का दिला. हिना खानचे लग्नाचे अचानक आलेले फोटो पाहून सगळ्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता लग्नाच्या एका आठवड्यानंतर, हिनाला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आहे. सध्या हिना व रॉकी हनिमूनला गेले आहेत. हनिमूनदरम्यानही हिना खान हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
हिना खान आणि रॉकी हनीमूनवर गेले आहेत. रॉकीने हिनासमवेत सूर्यास्ताचा आनंद घेत फोटो शेअर केला आहे. हिनाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही वाळवंटात सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना रॉकीने लिहिले, “आशा आहे की विश्वाची उर्जा आपल्या आयुष्यात प्रेम निर्माण करत आहे”.

रॉकीच्या पोस्टनंतर हिनाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती दंतचिकित्सकांच्या क्लिनिकमध्ये दिसतेय. फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे की, “वधू दातदुखीमध्ये आहे”. यासह, त्याने डॉक्टरांचे भव्य क्लिनिक या फोटोद्वारे दाखविले आहे. हिनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते अस्वस्थ झाले आहेत. आणि तिला काळजी घेण्यास सांगतांना दिसत आहेत.
हिना खानला स्टेज 3 स्तनाचा कर्करोग झाला आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती तिच्या चाहत्यांना उपचारांबद्दल नेहमीच अपडेट देत राहते. ती तिच्या आजाराशी सकारात्मक वागणूक देत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीला असे करताना पाहून आनंद झाला. हिना खानने कोणताच गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. लग्नात तिने एक साडी नेसली होती आणि त्यावर दागिने परिधान करत तिने नवऱ्या मुलीचा लूक पूर्ण केला होता. प्रत्येकाला हिनाचा लग्नातील लूक खूप आवडला आहे.





