मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

CID मधून डॉक्टर साळुंखेंची एक्झिट?, नरेंद्र गुप्तांना शोमधून काढण्यावरुन प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “आम्हाला मान्य नाही”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
CID Dr Salunkhe Narendra Gupta EXIT

CID मधून डॉक्टर साळुंखेंची एक्झिट?, नरेंद्र गुप्तांना शोमधून काढण्यावरुन प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “आम्हाला मान्य नाही”

बदलत्या काळानुसार टेलिव्हीजन विश्वातील बरीच गणितं बदलली. तंत्रज्ञान, कलाकार, कथा सगळ्यात बाबतीत छोट्या पडद्याचं एक वेगळं स्वरुप गेल्या काही वर्षांत समोर आलं. मात्र जुने काही टीव्ही शो अजूनही प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहेत. त्यातीलच एक शो म्हणजे ‘सीआयडी’. CID ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवलं. आजही प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या शोचे जुने एपिसोड पाहतात. १९९८ ते २०१८च्या काळात CID ने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचबाबत आता विविध चर्चा सुरु आहे. (CID Dr Salunkhe Narendra Gupta Exit)

मध्यंतरी एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजी साटम यांच्या जागी शोमध्ये नवा एसीपी आला असल्याची चर्चा होती. अभिनेता पार्थ समथानने एसीपी हे पात्र काही भागांसाठी साकारलं. यावरुन प्रेक्षकांनी बराच राग व्यक्त केला. शिवाजी साटम यांना पुन्हा शोमध्ये आणण्यात आलं. पार्थने आता शोमधून एक्झिट घेतली आहे. आता CIDमधील डॉक्टर साळुंखे म्हणजेच नरेंद्र गुप्ता शो सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही बातमी ऐकताच पुन्हा प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे.

आणखी वाचा – Video : अनेक जखमी, लाखोंचं नुकसान अन्…; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

Dr. Salunkhe & traitor ? Most shocking & highly unacceptable thing I saw in cid… this man gave his 27 years to Cid, log forensic unki vajah se jante hai & he is traitor. I really hope it's plan, bcoz we can't accept this. He is OG team member of Cid @Narendragupt#cid #cid2 pic.twitter.com/8a7XRTt3hf

— Shubhangi (@AnAdityan) June 8, 2025

शिवाजी साटमसह, ऋषिकेश पांडे, दयानंद शेट्टी, जान्हवी छेडा, श्रद्धा मुसले, आदित्य श्रीवास्तव आदी कलाकार CIDमध्ये विविध भूमिका साकारत आहेत. CIDच्या नव्या सीझनला आणि त्याच्या कथेला प्रेक्षकांचीही विशेष पसंती मिळत आहे. पार्थच्या एक्झिटनंतर आता कथेमध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. डॉ. साळुंखेला देशद्रोही घोषित करण्यात आलं आहे. याच गुन्हा अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलं. याच ट्वीस्टमध्ये डॉक्टर साळुंखे यांची शोमधून एक्झिट झाली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – मित्रानेच फसवलं, आयुष्यभराची कमाई गेली अन्…; मालिकांमध्ये काम करणाऱ्या जोडप्याचे रडून हाल, आता परिस्थिती अशी की…

आता CIDमध्ये डॉ. साळुंखे दिसणार नाहीत. सोशल मीडियाद्वारे प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत. तुम्ही डॉ. साळुंखेंना विलन का बनवलं, CID २च्या टीमबरोबर तुम्ही असं का करत आहात?, तुम्ही एक चांगली भूमिका मारुन टाकली, डॉ. साळुंखेला तुम्ही देशद्रोही कसे ठरवू शकता?, सीआयडीचं सगळ्यात जुनं पात्र आहे, आम्हाला तुमचा हा निर्णय स्वीकार नाही अशा संतप्त कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. डॉक्टर तारिकाचीही पुन्हा CIDमध्ये एन्ट्री होत आहे.

Tags: bollywood newscidentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Renuka Shahane Motherhood Experience

"जर मुलगी झाली असती तर…", डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, "वजन कमी करायला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.