गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rakhi Sawant Interview

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, "कोणाचा बाप बसलाय…"

Rakhi Sawant Interview : राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनयाबरोबरच राखी तिच्या मिश्किल स्वभावामुळे तसेच अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती ट्रोलदेखील होते. राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन असे देखील म्हटले जाते. राखीला कोणीही गांभीर्याने घेत नाही पण करमणुकीच्या बाबतीत ती पारंगत आहे. खूप स्ट्रगल करुन आलेली ही राखी आज तिच्या आयुष्यात सुखी आहे. राखीचा स्ट्रगल फार कमी जणांना ठाऊक असेल, इतकंच नाहीतर इंडस्ट्रीत काम करण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले. सिनेइंडस्ट्रीत कोणीही वारसा नसताना राखीने स्वतःच्या हिंमतीवर आपली जागा निर्माण केली. आज राखीचे जगभरात चाहते आहेत. लहानश्या चाळीतील घरातून सुरु झालेला तिचा हा स्ट्रगल आज यशाच्या शिखरावर आहे. आता तिची दुबईला स्वतःची घर आहेत.

आणखी वाचा –Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

नुकतीच राखीने ‘इट्स मज्जा’च्या Behind The fame या Podcast ला हजेरी लावली. यावेळी बोलताना तिने इंडस्ट्रीत येण्याआधीच्या स्ट्रगलबाबत सांगितलं. शिवाय घरच्यांच्या विरोधातून ती स्वतः कशी पायावर उभी राहिली हेदेखील सांगितलं. राखी म्हणाली, “लहानपणापासून मी खूप स्ट्रगल केला आहे. मी आई-बाबांना बघू, भावा-बहिणीला बघू की कोणाकोणाला बघू… मी लग्न करू की मुलं करु. मी खूप त्रास काढलाय. रात्रंदिवस एक करुन बॉलिवूडमध्ये छोटे छोटे कपडे घालून मी आयटम गर्ल किंवा रिॲलिटी शो क्वीन किंवा बेधडक त्सुनामी किंवा वाईल्ड कार्ड तसं मी माझं एक इमेज बनवली आहे आणि आजपर्यंत किती मुली आल्या आणि गेल्या, ३६ येतात आणि ३६ जातात. राखी सावंत तिथेच आहे. कुठल्याही शोमध्ये मला पाठवा तोडून फोडून येणार. माझ्या प्रेक्षकांना माझा सलाम आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात”.

आणखी वाचा – “कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

पुढे राखी म्हणाली, “मला हेच सांगायचं आहे , मी हे सगळं नाही केलं तर काय करू, बरेच लोक शॉर्टकट मारतात, पण मी तसं करत नाही. माझ्या बाबांनी मला एकदाच सांगितलं, तू जातेस पण आमच्या खानदानात असं कोणीच गेलं नाही आहे. हिटलर फॅमिली. बॉलिवूडमध्ये कोणीच गेलेलं नाही. आमचं नाक कापू नकोस. कसे कपडे घालतेस, मी नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणार. तिथे भरपूर लोक काय काय करतात पण मी तसं काही नाही करणार. मला एक आयटम डान्स करुद्या. तिथे बॉलिवूडमध्ये कोणाचा बाप बसलाय जो मला नऊवारी साडी नेसून डान्स कर असं सांगणार. पहिला काळ मीना कुमारीच्या वेळेचा वेगळा होता. त्यामुळे साडी नेसून गाणी सुपरहिट व्हायची. पण इथे साडी काढली की सुपरहिट होतात. साडी काढतात म्हणजे तू सुपरहिट. जितका छोटा ड्रेस तितकी मोठी हिरोईन. जसं दिसतं तसं विकतं”.

Tags: bollywood actressrakhi sawantRakhi Sawant struggle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding

"मला माझा संसार हवाय", राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, "मी बॉलिवूड सोडेन"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.