मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2026 | 11:00 am
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
Akshay Kumar fitness :

'या' बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

Akshay Kumar fitness : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बांगला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. १६ एप्रिलपासून त्याच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे सशुल्क पूर्वावलोकन सुरु झाले आहे. चित्रपटासोबतच अक्षय कुमार टीव्ही क्विझ रिॲलिटी शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ देखील होस्ट करत आहे. या शोदरम्यान खिलाडी कुमारने सांगितले की, त्याने गेल्या १५ वर्षांपासून समोसे खाणे टाळलं आहे. अर्थात अक्षय कुमार फिटनेसच्या बाबतीत किती सक्रिय आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. ५९ वर्षीय हा अभिनेता आजही तरुणाईला लाजवेल इतका फिट आहे. रोज सकाळी उठून योग्य तो व्यायाम, वेळेत आहार या सगळ्या सवयी अक्षय कुमार अगदी काटेकोरपणे पाळतो.

अशातच ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ शो दरम्यान स्पर्धक विधी भरणीने अक्षय कुमारला थेट प्रश्न विचारला, “सर, तुम्ही गेल्या १५ वर्षांपासून एकही समोसा खाल्ला नाही हे खरे आहे का?”. हसत हसत अक्षय उत्तरला, “त्यात काय झालं?’ (यात चुकीचे काय आहे?)”. यानंतर जेव्हा विधिने विचारले की असे स्वादिष्ट स्ट्रीट फूड कोणी कसे सोडू शकते, तेव्हा अक्षय कुमारने खरे कारण सांगितले. हा अजिबात डायटिंग किंवा वजन वाढण्याचा मुद्दा नाही, असे त्याने यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा – वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

View this post on Instagram

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

अक्षय कुमार म्हणाला, “मी डाएटिंगमुळे किंवा वजन वाढण्याच्या चिंतेने समोसे खाणे सोडले नाही, पण समोसे खाल्ल्याने ॲसिडिटी होते. अशा परिस्थितीत, मला स्वतःला त्यापासून दूर ठेवावे लागेल, जेणेकरुन कोणतीही अडचण येऊ नये”. संवादादरम्यान अक्षयने एक मजेदार किस्साही शेअर केला. तो म्हणाला, “‘जब तक रहेगा समोसे में आलू’ या गाण्याचे शूटिंग करत असतानाही मी एकही समोसा खाल्ला नव्हता”, हे ऐकून शोमध्ये उपस्थित लोक हसले.

आणखी वाचा – “मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

अक्षय कुमार ५९ वर्षांचा आहे, परंतु त्याचा फिटनेस पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल. तो पूर्णपणे आरोग्याबाबत जागरूक आहे. खिलाडी कुमार स्वतःला खूप स्वच्छ ठेवतो आणि निरोगी जीवनशैली पाळतो. अक्षयने अनेकदा सांगितले आहे की तो वेळेवर झोपतो आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो. तो अनेकदा संध्याकाळी सातच्या आधी जेवण करतो.

Tags: actor lifestyleakshay kumar healthhealth update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Sonali Kulkarni latest post

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या 'त्या' कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.