शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पैसे नाहीत त्याला…”, मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने लाखो रुपये थकवल्यामुळे शशांक केतकर भडकला, म्हणाला, “इंडस्ट्रीमधील मोठी नावं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 2, 2023 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shashank ketkar facebook post

“पैसे नाहीत त्याला...”, मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने लाखो रुपये थकवल्यामुळे शशांक केतकर भडकला, म्हणाला, “इंडस्ट्रीमधील मोठी नावं...”

कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकारांना बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागतो. काम मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत तसेच प्रत्येक भूमिकेसाठी किती मानधन मिळणार? हा मोठा प्रश्न असतोच. काही कलाकारांना तर केलेल्या कामाचं मानधनही दिलं जात नाही अथवा कामाचे पैसे रखडवले जातात. असंच काहीचं मराठी अभिनेता शशांक केतकरच्या बाबतीत घडलं आहे. शशांकने फेसबुकद्वारे सविस्तर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

मराठी चित्रपटाच्या एका निर्मात्याने शशांकचे पैसे थकवले असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याचे निर्मात्याची कानउघडणी केली आहे. शशांक म्हणाला, “मी आणखी एका फसवणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर काम केलं आहे. ज्या प्रॉडक्शन हाऊसने मला xxxxxxx लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं. त्यांच्या अपेक्षेनुसार मी पूर्ण कामही करुन दिलं. (डबिंग वगळता)”.

आणखी वाचा – बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट असूनही ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी, एका आठवड्यातच कमावले इतके कोटी

“गेल्या काही महिन्यांपासून मी या फसव्या प्रॉडक्शन हाऊसचा पाठपुरावा करत आहे. मात्र प्रत्येकवेळी त्या लोकांनी मला कारणं दिली. मी एका मराठी चित्रपटाबाबत बोलत आहे ज्या चित्रपटात इंडस्ट्रीमधील मोठी नावं आहेत. त्या बड्या कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे आधीच देण्यात आले आहेत. पण मी आणि टीममधील इतर बऱ्याच लोकांना २० टक्केही मानधन देण्यात आलं नाही”.

आणखी वाचा – मृत्यूपूर्वीच्या ‘त्या’ शेवटच्या १५ तासांमध्ये सिद्धार्थ शुक्लाबरोबर नेमकं काय घडलं होतं?, त्याक्षणी रुग्णालयामध्ये नेलं पण…

पुढे तो म्हणाला, “संपूर्ण माहिती तसेच निर्माते व माझ्यामध्ये झालेला संवाद याचा संपूर्ण तपशील योग्य त्यावेळी मी प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहे. गंमतीचा भाग म्हणजे एखाद्याला अभिनय येत नसेल तर त्याला आपण कलाकार म्हणत नाही. मग ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला आपण निर्माता का म्हणतो?”. शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तू योग्य आहेस असं म्हटलं आहे.  

Tags: marathi actormarathi moviemarathi serialshashank ketkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Subhedar Movie Budget

दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार'ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.