गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2025 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya bapat online shopping experience

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या...”

बाजारात जाऊन भाजी, फळं, विविध जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात वेगळंच सुख असतं. ताजी भाजी दिसली की, खरेदी करण्याचा मोहही आवरत नाही. मात्र अलिकडच्या काळात चित्र काहीसं बदलेलं दिसतं. लोकांचं ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. झेप्टो, स्वीगी इन्स्टामार्ट, ब्लिंकइट सारख्या ऑनलाइन दुकानातून विविध खरेदी केली जाते. कामाअभावी न मिळणारा फारसा वेळ यामुळे आता ऑनलाइन मार्गाचा अवलंब केला जातो. मोबाईलवरुन या अ‍ॅपद्वारे एखादी भाजी, वस्तू ऑर्डर केली की, १० ते १५ मिनिटांच्या आत दारात हजर. पण आता ऑनलाइन खरेदीचा वापर वाढल्यानंतर याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. याचाच अनुभव सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापटला आला. (Priya bapat online shopping experience)

Zepto, blinkit द्वारे ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण अधिकाधिक वाढलं आहे. स्वयंपाकघरात लागणारी एखादी गोष्ट ऑर्डर केली तर काही मिनिटांमध्ये ती हातात असते. पण याचे जितके फायदे आहेत तितकेच दिवसागणिक तोटेही समोर येत आहे. या अ‍ॅपद्वारे आता कित्येक जणांना खराब वस्तू डिलिव्हर होत असल्याची प्रकरणं समोर येत आहेत. सोशल मीडियाद्वारे ग्राहक फोटो पोस्ट करत तक्रार करतात. त्यामुळे आता ऑनलाइन खरेदी करणाऱ्या अ‍ॅपचा दर्जा घसरला आहे की काय? असा प्रश्न उद्भवला आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

प्रियालाही याचा चांगलाच अनुभव आला. झेप्टोवरुन सतत ती काही ना काही ऑर्डर करते. मात्र तिला याचा वाईट अनुभव आला. म्हणून प्रियाने blinkit वरुन भाजी मागवली. मात्र तिला किड लागलेली भाजी आली. ऑर्डर केलेला कोबी अगदी सडलेला होता. याचाच तिने फोटोही शेअर केला. या कोबीमध्ये अक्षरशः किडे झाले होते. हे पाहून ती हैराणच झाली.

आणखी वाचा – “बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया म्हणाली, “झेप्टोद्वारे डिलिव्हरी करण्यात येणाऱ्या घाणेरड्या दर्जाची फळं व भाजांचा मला कंटाळा आला होता. म्हणून मी blinkit वरुन ऑर्डर करायचं ठरवलं. पण याचा अनुभव आधीपेक्षाही अधिक वाईट होता. Blinkit वरील माझी ही पहिलीच ऑर्डर होती. त्यांनी मला पूर्णपणे सडलेला कोबी पाठवला. त्याला अगदी घाणेरडा वासही येत होता. मी जेव्हाही कधी खालच्या दर्जाच्या वस्तू डिलिव्हर केल्या गेल्या मी तक्रार केली. त्याचे पैसेही मला परत आले. पण ही फक्त पैसे परत करण्याची गोष्ट नाही. तुम्ही किती चांगल्या प्रकारच्या वस्तू डिलिव्हर करण्याचं वचन देता त्याचा हा प्रश्न आहे. ज्या गोष्टी लवकर खराब होतात त्या चांगल्या आहेत की नाहीत हे तपासूनच डिलिव्हर करणं गरजेचं आहे. अशाप्रकारच्या वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. आणि त्याहीपेक्षा अधिक निराशा आहे”. प्रियाने पोस्टद्वारे संताप व्यक्त केला.

Tags: entertainment newsmarathi actresspriya bapat
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Next Post
Niranjan Kulkarni Wedding Video

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.