दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ चित्रपट गेल्या आठवड्यात महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. ‘श्री शिवराज अष्टक’ मधील या पाचव्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील थरारक सीन्स, गाणे गाजत असून कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटाचे एक आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाने या आठवड्यात चांगली कमाई केली आहे. (Subhedar Movie Box Office Collection)
‘सुभेदार’ला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. आता चित्रपटाच्या एका आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. आठवड्याभरात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाने एका आठवड्यात तब्बल ८.७४ कोटींची कमाई केली असून येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – Video : डोळ्यात पाणी, भावुक अन्…; सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर, जुन्या घराचा निरोप घेताना म्हणाली, “मला खरंच…”
चित्रपटातील थरारक सीन्स, गाणी व उत्तम दिग्दर्शन यांमुळे प्रेक्षकांनी ‘सुभेदार’ चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. एकीकडे ‘गदर २’, ‘ड्रीम गर्ल २’ सारखे बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सुरु असताना ‘सुभेदार’ सारखा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही तग धरून आहे. चित्रपटाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘सुभेदार’च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यात म्हणाले, “मैत्री, शौर्य आणि बलिदानाची वीरगाथा झाली सुपरहिट… ‘सुभेदार’ च्या संपूर्ण टीमकडून मायबाप प्रेक्षकांचे मन:पूर्वक धन्यवाद!”
हे देखील वाचा – “गणेशमंडळांना लाऊडस्पीकरसाठी रात्री १२पर्यंत परवानगी अन् सवाई महोत्सवाला…?”, वैभव मांगलेंचा प्रशासनाला सवाल, नेटकरी म्हणतात, “राजकारण्यांच्या…”
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ चित्रपट सिंहगड किल्ल्यावरील लढाई आणि नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित आहे. ज्यात मुख्य भूमिकेत अभिनेते अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी व अन्य कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील थरारक सीन्स, गाणी व उत्तम दिग्दर्शन यांमुळे प्रेक्षकांनी ‘सुभेदार’ चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. (Subhedar Movie Box Office Collection)