‘आमचं ठरलं’ हा हॅशटॅग सध्या कलाकार मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच ‘आमचं ठरलं’असं म्हणत गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या अफेअरची ऑफिशिअल घोषणा केली. या शिवाय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांनी देखील ‘आमचं ठरलं’ म्हणत गुडन्यूज दिली. तसेच अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांनीही गुपचूप साखरपुडा सोहळा उरकला. यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने साखरपुडा सोहळा उरकला असल्याचे समोर आले आहे. (Sonal Pawar Engagement)
‘तुला पाहते रे’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘सरस्वती’, ‘शौर्य’ या मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनल पवार. आजवर सोनलने बऱ्याच मराठी मालिकांमधून तसेच मराठी गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकाविश्वात सहकलाकाराची भूमिका साकारत सोनलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या सोनल ‘रमा राघव’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतेय. अशा या मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकताच तिचा साखरपुडा सोहळा उरकला आहे.
काळ रविवारी सोनलने तिचा साखरपुडा सोहळा उरकला आहे. तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सोनलने समीर पालुष्टेसह साखरपुडा सोहळा उरकला आहे. सोनल यांच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोघांनीही साखपपुड्यात धम्माल केलेली दिसतेय. समीर व सोनलने एकमेकांना गुडघ्यावर बसुन अंगठी घातली. याशिवाय रोमँटिक अंदाजात दोघांनी साखरपुड्याचं फोटोशुट केलं आहे.
सोनलने समीर पालुष्टेबरोबर साखरपुडा केला आहे. समीर हा बिझनेसमन असून स्पार्कल्स मीडिया या कंपनीचा तो फाऊंडर तसेच सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार ही मिळाला आहे. समीर-सोनल यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या रोमँटिक व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवत लाईक्सचा वर्षाव केला आहे.