छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची बरीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर हे जोडपे कधी लग्नबंधनात अडकणार, याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहे. अशात मुग्धा-प्रथमेशचा साखरपुडा संपन्न झाला. दोघांनी त्यांच्या साखरपुड्याची ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. (Mugdha Vaishampayan and Prathmesh Laghate engagement)
मुग्धा आणि प्रथमेश यांचा साखरपुडा त्यांच्या कोकणातील गावी अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे सुंदर क्षण इन्स्टाग्रामद्वारे समोर आले. केशरी रंगाची साडी, त्यावर शोभेल असा साजशृंगार मुग्धाने यावेळी केला होता. तर प्रथमेशने लाल रंगाचा सदरा, त्यावर टोपी असा पेहराव परिधान केला होता. या पारंपरिक लूकमध्ये हे दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला, ज्याला ‘वाङ्निश्चय’ असा सुंदर कॅप्शन दिलं आहे. मुग्धा-प्रथमेशच्या या फोटोवर स्पृहा जोशी, सुकन्या मोने यांसारख्या कलाकार मंडळींनी अभिनंदन केले. तसेच चाहत्यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
हे देखील वाचा – Video : …अन् मंचावरच ‘त्या’ व्यक्तीने कौतुक करताच रडू लागली तितिक्षा तावडे, पुरस्कार स्वीकारला आणि…; व्हिडीओ व्हायरल
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून मुग्धा व प्रथमेश यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या गायनाचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोनंतर दोघांनी ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. काही काळानंतर दोघांमध्ये ही मैत्री वाढली. आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी या नात्याची घोषणा केली. मुग्धा आणि प्रथमेशचं स्वतःचं युट्युब चॅनेल देखील असून ते या चॅनेलवर त्यांच्या गाण्याचे व्हिडीओज शेअर करतात. तसेच सोशल मीडियावर विविध फोटोज शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमीच राहतात.
हे देखील वाचा – Aarti Solanki : “तू स्वतःला बच्चन समजू नकोस…”, चॅनलच्या EP कडून करण्यात आलेला आरती सोळंकीचा अपमान, म्हणाली, “माझ्यासाठी स्वाभिमान…”
काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेशचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला होता. दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही. मात्र दिवाळीनंतर हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.