गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एवढे वाईट दिवस आले का?”, बोल्ड फोटोशूटवरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, “फक्त फेमसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2023 | 11:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Resham Shrivardhan Troll

"एवढे वाईट दिवस आले का?", बोल्ड फोटोशूटवरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, "फक्त फेमसाठी…"

बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र अभिनय करताना त्यांना कायमचं ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. बरेचसे कलाकार असे आहेत जे या ट्रोलिंगवर सडेतोडपणे भाष्य करतात. तर काही कलाकार असे आहेत जे या ट्रोलिंगकडे सहसा दुर्लक्ष करतात. कित्येकदा हे कलाकार त्यांनी पोज देत शेअर केलेल्या फोटोंवरून, कपड्यांवरून ट्रोल होताना दिसतात. अशातच हटके व बोल्ड पोज देत शेअर केलेल्या एका फोटोवरून एका मराठमोळ्या अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. (Resham Shrivardhan Troll)

एकांकिका, रंगभूमी, मालिका, सिनेमे, वेबसीरिज या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेशम श्रीवर्धन. रेशमने आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही बरंच काम केलं आहे. ‘एक थी बेगम’ या प्रचंड गाजलेल्या वेबसीरिजमध्ये रेशमची महत्वपूर्ण भूमिका होती. रेशमचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा असतो. रेशम नेहमीच हटके अंदाजात फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच रेशमने शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – ‘रमा राघव’ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Resham. (@resham._.resham)

रेशमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या बोल्ड फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोला पाहून अनेकांनी रेशमला चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “काय फालतूपणा आहे, आता फेमसाठी एवढे वाईट दिवस आले का. हे तिच्याकडून अपेक्षित नाही”. तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत रेशमला असे बोल्ड फोटोशूट न करण्याची विनंती केली आहे.
त्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मॅडम तुम्ही छान आर्टिस्ट आहात, तुम्हाला कामं मिळतील मिळत राहोत पण तुम्ही त्या विचाराने हे असले फोटो शूट करत असाल तर कृपया बंद करा, खूप आदर आहे तुमच्या कामाबद्दल”.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न, साधेपणाने वेधलं लक्ष, खास फोटो समोर

रेशमला अनेकांनी कमेंट करत त्यांच्या ‘कामाबद्दल आदर आहे, तुम्ही असे फोटोशूट करू नका’, अशी विनंती केली आहे. यावर अद्याप रेशमने काहीच भाष्य केलेलं नाही. रेशमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मालिकाविश्वाकडून वेबसीरिजकडे वळली आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi malikamarathi serialresham shrivardhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Hardeek Joshi Comeback

'तुझ्यात जीव रंगला'नंतर राणादाचा नवा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.