Hari Narke Passed Away : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं आज निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. एशियन हार्ट रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला. ते समता परिषदेते उपाध्यक्ष होते. मुंबईमध्ये समता परिषदेची १० ऑगस्टला (गुरुवार) बैठक होती. त्यासाठी ते आज पुण्याहून मुंबईला येणार होते. मात्र पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. सतत होणाऱ्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
हरी नरके यांना उलट्यांचा त्रासही होत होता. दरम्यान रुग्णालयामध्य नेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. फुले व आंबेडकर यांचे विचार व कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हरी नरके यांनी केलं. शिवाय शासकीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये हरी नरके यांचा खारीचा वाटा होता.
हरी नरके यांच्या निधनानंतर अजित पवार तसेच इतर राजकीय मंडळींनी श्रद्धांजली वाहिली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रमिती नरके ही त्यांची मुलगी. वडिलांच्या निधनानंतर तिने बाबांबरोबरचा तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला. शिवाय हेमांगीनेही हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा – “आई-वडिलांचा घटस्फोट झाला अन्…”, आमिर खानच्या लेकीचा आजारपणाबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आजारासाठी ”

हेमांगी म्हणाली, “हरी नरके सारख्या व्यक्तींच्या जाण्याने फक्त त्यांच्या घरातल्यांचं नाही तर अख्ख्या समाजाचं नुकसान होतं. सर तुम्हाला भेटायचं राहून गेलं. पण तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमची पुस्तकं कायम मार्गदर्शक ठरतील. प्रमिती तुझ्यासाठी हा किती मोठा धक्का असू शकतो याची मला कल्पनाही करवत नाही. तू तुझी काळजी घे. बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायची आहे.” प्रमितीनेही इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.