ढोलकी वाजली की आठवण येते ती लावणीची. महाराष्ट्रात लावणी हा प्रकार खुप जास्त लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील लावणीतून वेड लावणाऱ्या नृत्यांगनांचा विचार केला की माधुरी पवार आणि गौतमी पाटील यांची नावं समोर येतात. महाराष्ट्रातील सध्या सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यांतून प्रेक्षकांच मन जिकलं आहेत. (Gautami And Madhuri Dance Video Viral)
दोघींचेही सर्वत्र लाखो चाहते आहे. आतापर्यंत चाहत्यांनी या दोघींनाही वेगवेगळ्या मंचावर थिरकताना पाहिलं आहे. पण नुकत्याच एका कार्यक्रमात पहिल्यांदा या दोघी एकाच मंचावर एकत्र दिसल्या.हडपसर येथील ‘टिओस कॅफे’च्या उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी आपली नृत्यकला सादर केली. माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एका पेक्षा एक आहेत. दोघींचीही नृत्यशैली वेगवेगळी आहे. त्यामुळे सगळीकडेच त्यांचा चाहतावर्ग आहे.
वाचा – कोण कोणावर पडलं भारी ? (Gautami And Madhuri Dance Video Viral)
प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद पाहायला मिळतो. तसाच प्रतिसाद हडपसरमधील कार्यक्रमातही दिसून आला. पण या ठिकाणी गौतमीच्या डीजे शोवर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडताना दिसली.
माधुरी ही झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोची विजेती होती. माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश मिळवलं आहे. लावणी हा महाराष्ट्राची लोककलेचा प्रकार आहे. लावणी हा नृत्य प्रकार नेमका काय आहे? हे माधुरीने तिच्या दिलखेच अदांनी साऱ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. लावणी सादर करणारी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे, हे देखील माधुरीने सिध्द करुन दाखवलं. माधुरीने हडपसर येथे सादर केलेल्या लावणीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमानंतर तिचं कौतुक देखील होत आहे.