मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा पार पडल्यानंतर इरा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. इरा चित्रपटसृष्टीपासून दूर असली ती कायमच चर्चेत असते. बऱ्याचदा इराने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. तिने तिच्या मानसिक आरोग्याबाबत याआधीही खुलेपणाने बोलणं पसंत केलं आहे. इतकंत नव्हे तर तिचं फिटनेस व वेलनेस सेंटरही आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इराने तिच्या मानसिका आजाराबाबत खुलासा केला.
मानसिक आजार हा बऱ्याचदा अनुवंशिक असतो असं इराचं म्हणणं आहे. इरा म्हणते, “माझ्या आई-वडिलांना मानसिक आजाराचा त्रास होता. मला मानसिक आजार होण्यामागच्या कारणांमध्ये माझे आई-वडिलही होते असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. शिवाय दोघांनीही (आई-वडिलांनी) त्यांचा घटस्फोट आणि त्यादरम्यानचा काळ उत्तमरित्या सांभाळला”.
इरा आमिर व त्याची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. आमिर व रिनाचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा इरा खूप लहान होती. इरा तिच्या मानसिक आजारासाठी आई-वडिलांना जबाबदार ठरवत नाही. इरा पुढे म्हणाली, “घटस्फोट हा चर्चेचा विषय ठरु नये याची माझ्या आई-वडिलांनी पुरेपुर काळजी घेतली. पण घटस्फोटाबाबत माझं एक वेगळंच मत होतं”.
आणखी वाचा – ‘माझं नाव वापरु नकोस’ नियम मोडणाऱ्या क्रांती रेडकरची समीर वानखेडेंनी केलेली कानउघडणी, म्हणाले, “अशा फालतू…”
“त्यामुळेच प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. माझ्या मानसिक आजारासाठी माझे आई-वडील जबाबदार नाहीत. वयाच्या ८ ते १० वर्षांची असताना माझं दुःख लपवण्यासाठी मी खोटं हसायचे. दरम्यान माझा मानसिक आजार आणखीनच वाढत गेला”. रिनाबरोबर घटस्फोट झाल्यावर आमिरने कधीच इराला अंतर दिलं नाही. आजही आमिरचं संपूर्ण कुटुंब एकत्र असतं.