शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर ११ वर्षाने लहान मुलीच्या प्रेमात अन्…; सुनील तावडेंनी सांगितली लव्हस्टोरी, म्हणाले, “एकत्र कुटुंबात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2026 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunil Tawde Divorce

घटस्फोटानंतर ११ वर्षाने लहान मुलीच्या प्रेमात अन्…; सुनील तावडेंनी सांगितली लव्हस्टोरी, म्हणाले, "एकत्र कुटुंबात…"

Sunil Tawde Divorce : असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करताना दिसतात. बरेचदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, प्रसंग ते चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. तर काही असे कलाकार आहेत जे वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं टाळतात. अशातच आता एका मराठी अभिनेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. हे अभिनेते म्हणजे सुनील तावडे. सुनील तावडे यांनी आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विनोदी आणि गंभीर भूमिकांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. १९८७ मध्ये सुनील तावडे यांनी सोनाली यांच्याशी विवाह केला पण त्याआधी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. सोनाली यांच्याबरोबरच्या लव्हस्टोरीबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

सुनील तावडे यांनी नुकत्याच दिलेल्या ‘आरपार’ युट्युब चॅनेलला मुलाखतीत असं म्हटलं की, “सोनालीला भेटण्यापूर्वी माझा आधी एक घटस्फोट झाला होता. जेव्हा घटस्फोट घ्यायचं निश्चित झालं त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास चार वर्ष लागली. आता तेव्हा काय करायचं हे मला कळत नव्हतं. कारण, घटस्फोट मिळत नव्हता आणि आयुष्य असंच पुढे सुरु होतं. त्यादरम्यान एक एकांकिका सुरु होती. तिथे ऑडिशनसाठी एक मुलगी तिच्या कुटुंबीयांबरोबर आली होती. आता तेव्हाच्या काळात जरा व्यवस्थित काम करता आलं की लगेच सिलेक्ट करायचे. ती मुलगी एकांकिका करण्यासाठी हो म्हणाली. म्हटलं चला आता कॉफी प्यायला जाऊयात. कॉफी प्यायला गेल्यावर तिच्या वडिलांशी आणि आता जो माझा मेहुणा आहे म्हणजे तिच्या भावाशी मी खूप गप्पा मारल्या. विशेषत: तिचे वडील इतके विनोदी होते मला खरंच त्यांच्याशी गप्पा मारुन खूपच भारी वाटलं होतं. ते सुद्धा नकलाकार होते. गप्पागोष्टी करताना अनेक संदर्भ समजले, आपआपसांत छान ओळख झाली. त्यादिवशी मी घरी जाऊन सांगितलं होतं की, आज मी आयुष्यात खूप छान लोकांना भेटलोय. तर, सांगायचा मुद्दा असा की, तिचे वडील मला आधी आवडले, त्यानंतर मग मुलगी (सोनाली) आवडली”.

आणखी वाचा – “त्यांचा विश्वास नाकारणारा मी कोण?”, आईच्या अंत्यसंस्कारावर सुप्रसिद्ध अभिनेता ट्रोल, चोख उत्तर देत म्हणाला, “साधी गोष्ट…”

पुढे त्यांनी पत्नीबरोबरची लव्हस्टोरी सांगत असं म्हटलं की, “हळूहळू तिलाही समजलं हा आपल्या प्रेमात आहे. मग, मी तिला सगळ्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या, आताची मुले जशी सगळे थेट जाऊन आई-बाबांना सांगतात, आधी असं नव्हतं. तिच्या घरच्यांसमोर माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे यासाठी मी त्यांना अनेकदा मदत केली. त्यावेळीच दुसऱ्या बाजूला माझी घटस्फोटाची केस सुद्धा सुरु होती. तेव्हा मग मी जे काही खरंय ते तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. तिलाही हे सगळे समजल्यावर थोडा धक्का बसला होता. मग, मी तिला नीट सगळ्या गोष्टी सांगितल्या. सुरुवातीला मी सगळ्या गोष्टी सोनालीला सांगितल्या. त्यानंतर मग तिने तिच्या घरी कल्पना दिली. आश्चर्य म्हणजे तिच्या घरचे म्हणाले, ‘ठिक आहे काहीच हरकत नाही’ जर तुझ्या बाबतीत असं घडले असतं तर? त्यांचं घर खरंच खूप छान होतं. त्यांच्या घरात १४ लोक राहत होते. एकत्र कुटुंबात ती लहानाची मोठी झाली होती. म्हणूनच मी सुद्धा सोनालीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण, ती पुढे जाऊन माझ्याही कुटुंबात ती अशाचप्रकारे मिळून मिसळून राहील”.

आणखी वाचा – आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसणे धूम्रपानाइतकेच धोकादायक, तर ‘या’ सवयी बनवतील तुम्हाला लवकर म्हातारं, जाणून घ्या…

“माझ्यापेक्षा ती वयाने खूप लहान होती. आम्हा दोघांमध्ये ११ वर्षांचं अंतर आहे. माझी पत्नी २१ वर्षांची असताना आमच्या मुलीचा जन्म झाला. या सगळ्यात सुद्धा एक गोष्ट आवर्जून सांगेन. माणसाला एकदा ठेच लागली की माणूस जास्त शहाणा होतो. माझ्या आत्याने सुद्धा लग्नाच्या बाबतीत नीट विचार करुन निर्णय घे असं मला सांगितलं होतं. मग, त्यानंतर मी लग्न करताना भरपूर विचार करुन निर्णय घेतला होता”, असंही सुनील तावडेंनी यावेळी सांगितलं.

Tags: entertainmentmarathi actorsunil tawde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Salbardi Marathi Movie

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्टसह ‘सालबर्डी’ येतोय, मराठी कलाकारांची फौज स्क्रीन गाजवणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.