शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्टसह ‘सालबर्डी’ येतोय, मराठी कलाकारांची फौज स्क्रीन गाजवणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2026 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salbardi Marathi Movie

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्टसह ‘सालबर्डी’ येतोय, मराठी कलाकारांची फौज स्क्रीन गाजवणार

Salbardi Marathi Movie : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.
‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आणखी वाचा – आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसणे धूम्रपानाइतकेच धोकादायक, तर ‘या’ सवयी बनवतील तुम्हाला लवकर म्हातारं, जाणून घ्या…

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

आणखी वाचा – तुम्हीही जास्त वेळ हिल्स घालून असता का?, गुडघ्यांवर होईल गंभीर परिणाम, वाचा सविस्तर

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Tags: marathi moviesalbardi Marathi MovieSalbardi Movie Pooja Sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Dipika kakar health update

"शरीरातून १.३ सेमी…", शस्त्रक्रियेनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली, आधी कॅन्सरने ग्रासलं आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.