Dipika kakar health update : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने यकृताच्या कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर काही महिन्यांनी आरोग्याच्या समस्यांशी लढा देण्याबाबत खुलासा केला आहे. ती आणि तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिम, त्यांच्या YouTube चॅनेलवर त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी अपडेट शेअर करतात. दीपिकाच्या चॅनलवर शेअर केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये तिने तिच्या तब्येतीबद्दल भाष्य केलं आहे आणि तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. तसेच शरीरात इतके बदल होऊनही महिला प्रत्येक गोष्टीला किती दमदारपणे सामोरे जातात हे देखील सांगितले आहे. दीपिका कक्करने शेअर केले की ती गेल्या काही दिवसांपासून अनेक क्लिप शूट करत आहे, पण ती व्लॉग पूर्ण करु शकली नाही.
दीपिका म्हणाली, “असे काही कारण नाही, म्हणजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, तर माझ्यासोबत हे पुन्हा घडले आहे.1.3 सेंटीमीटरची ती छोटी सिस्ट माझ्या शरीरातून बाहेर काढण्यात आली आहे, त्यानंतर मी थोडी हलली आहे”. ती पुढे म्हणाली की, “गेल्या काही दिवसांपासून मी या गोष्टींचा विचार करत आहे आणि स्त्रीचे शरीर किती गुंतागुंतीचे असते हे समजले आहे”. ती म्हणाली की, “आम्ही स्त्रिया आपल्यापेक्षा कितीतरी बलवान आहोत”. दीपिका म्हणाली की, “स्त्रिया त्यांचे शरीर, मासिक पाळी, हार्मोनल समस्या, मूड बदलणे आणि कोणताही आजार असूनही त्यांचे जीवन अतिशय सहजतेने हाताळतात. दीपिकाने महिलांच्या आत्म्याला आणि शक्तीला सलाम केला”.
तब्येतीत बदल
दीपिकाने असेही सांगितले की ती जेव्हा थकते तेव्हा झोपते.तिने सांगितले की तिच्या आरोग्यामुळे त्यांची जीवनशैली किती बदलली आहे. दीपिका कक्करला स्टेज 2 यकृताचा कर्करोग आहे. दीपिका गेल्या काही महिन्यांपासून स्टेज 2 यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. जून २०२५ मध्ये, अभिनेत्रीने तिच्या चालू उपचारांचा एक भाग म्हणून ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया केली. तेव्हापासून, दीपिका तिच्या केमोथेरपीचा अनुभव, भावनिक चढ-उतार आणि तिच्या हळूहळू बरे होण्याच्या दिशेने उचललेली पावले यासह तिच्या आरोग्याविषयी सर्व अपडेट तिच्या YouTube चॅनेलवर शेअर करत आहे.
आणखी वाचा – रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्टसह ‘सालबर्डी’ येतोय, मराठी कलाकारांची फौज स्क्रीन गाजवणार
‘ससुराल सिमर का’ने मिळाली प्रसिद्धी
ती आणि शोएब दोघेही दररोज आपापल्या व्हलॉग्सवर अपडेट्स पोस्ट करतात, चाहत्यांना जोडतात आणि माहिती देतात. दीपिका ‘ससुराल सिमर का’ या हिट टीव्ही शोमध्ये सिमर भारद्वाजच्या भूमिकेसाठी ओळखली गेली. तिने ‘बिग बॉस सीझन १२’ही जिंकला आहे.





