मराठी मनोरंजन सृष्टीतील ‘विनोदाचा अशोक सम्राट’ म्हणून ज्यांना ओळखले जाते असे एकमेव कलाकार म्हणजे अभिनेते अशोक सराफ. त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या विनोदी व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येते. तर त्याच्या आशयघन भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात टचकन पाणीदेखील येते. मनोरंजन विश्वातल्या या ‘नटसम्राट’ला यंदाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा करून अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. याच निमित्ताने अशोक सराफ यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानिमित्ताने त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर आनंदाच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर एक खंतही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – उर्वशी रौतेलाचं अनुकरण केल्याची चर्चा होताच मनारा चोप्रा सावध, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल, म्हणाले, “इथेही…”
‘इट्स मज्जा’सह साधलेल्या संवादादरम्यान, निवेदिता व अशोक सराफ यांना येत्या काळात “तुम्ही दोघे एकत्र काम करताना कधी पाहायला मिळणार?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत निवेदिता यांनी असे म्हटले की, “आम्हा दोघांना कुणी एकत्र कामच देत नाही. एकत्र काम करायची आमचीही इच्छा आहे. पण आमच्याकडे कुणी चांगली संहिता घेऊन येत नाही. ‘सारखं छातीत दुखतंय’नंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केलंच नाही.”
आणखी वाचा – ‘नाद केला पण…’, डोंगरीमध्ये गर्दी जमवणं मुनव्वर फारुकीला भोवलं, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांची कारवाई
यापुढे अशोक सराफ यांनी असे म्हटले की, “वसंत सबनीस, अशोक पाटोळे यांच्यानंतर चांगले लेखन करणारे लेखकच कमी झाले. हल्ली कुणीही साफ विनोद लिहीत नाही. प्रासंगिक विनोद लिहिणारे लेखक हल्ली कमी झाले आहेत.” तसेच यापुढे त्यांनी “कदाचित निवेदितासमोर अशोक सराफचा प्रभाव कमी पडतो असं लोकांना वाटत असेल म्हणून आम्हाला एकत्र कुणी काम देत नाही.” असं गंमतीत म्हटलं. त्याचबरोबर “लवकरच आम्ही कदाचित एकत्र नाटक करू” असं आश्वासनही दिलं आहे.