‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात कायम चर्चेत असलेल्या काही नावांपैकी एक नाव म्हणजे मनारा चोप्रा. मनारा ही ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून चर्चेत होती. अशातच नुकताच बिग बॉस १७चा महाअंतिम सोहळा पार पडला. यात मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले, तर मनारा 2nd रनर अप होती. टॉप २ मध्ये जाण्यापूर्वीच तिचा या घरातील प्रवास संपला. पण तरीदेखील मनाराने चाहत्यांच्या मनात तिची जागा निर्माण केली.
‘बिग बॉस’नंतर अनेकांच्या आयुष्यात बदल झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. बिग बॉसमधून बाहेर येताच असाच एक बदल मनारामध्येही झाला आहे आणि हा बदल तिने स्वत:हून केला आहे. मनाराने बिग बॉसमधून बाहेर येताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये बदल केला आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
#MannaraChopra earlier updated her Insta Bio as WINNER IN FEMALE CATEGORY. ????????????????
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 29, 2024
Now she has changed her bio to only #BiggBoss17 Runner-up. (Not even 2nd Runner-up ????) pic.twitter.com/qrzlz1nDAK
आणखी वाचा – ‘बिग बॉस’साठी परिणीती चोप्राकडून पाठिंबा न मिळण्याबाबत मन्नारा चोप्रा स्पष्टच बोलली, म्हणाली, “जुने वाद…”
मनाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये काही बदल केले आहेत. मनाराने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘2nd रनर अप’ यासह महिला श्रेणीची विजेती’ असंही म्हटलं आहे. परंतु, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या या बायोमधील बदलावर नेटकऱ्यांनी एकाने “तिने हा निर्णय निराश होऊन घेतला असेल” असं म्हटलं आहे, तर आणखी एकाने “मनारा इथेही ओव्हरअॅक्टिंग करत आहे” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘नाद केला पण…’, डोंगरीमध्ये गर्दी जमवणं मुनव्वर फारुकीला भोवलं, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांची कारवाई
दरम्यान, मनाराच्या या बायोमधील बदलामुळे अनेकांनी तिने अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे अनुकरण केले असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे मनाराने उर्वशीबरोबर तिची बरोबरी केली असल्याच्या प्रतिक्रिया येताच तिने आपला बायोमध्ये पुन्हा बदल केला आहे आणि ‘बिग बॉस १७ रनरअप’ असं लिहिलं आहे.