शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फुकटात फिरायला…”, काम नाही तरीही मिताली सतत फिरते कशी?, चर्चा करणाऱ्यांना नवऱ्यानेच दिलं थेट उत्तर, म्हणाला, “मी तिचा नवरा आहे म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2023 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth-Mitali Diwali Padwa

"फुकटात फिरायला…", काम नाही तरीही मिताली सतत फिरते कशी?, चर्चा करणाऱ्यांना नवऱ्यानेच दिलं थेट उत्तर, म्हणाला, "मी तिचा नवरा आहे म्हणून…"

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यंग व क्युट कपल म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांना ओळखले जाते. गेल्या सहा वर्षांपासून दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये ते विवाहबंधनात अडकले, ज्याची चर्चा मराठी मनोरंजन विश्वात रंगली होती. नुकत्याच दिवाळी पाडवा निमित्त ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने बायकोचं भरभरून कौतुक केलं. (Siddharth-Mitali Diwali Padwa)

मिताली लग्नानंतरच्या दोन वर्षात जबाबदारीने मोठी झाली आहे का याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “गेली सहा वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. यांतील गेल्या आठ महिन्यांत मितालीमध्ये जास्त फरक पडला आहे. आणि आठ महिन्यांत का तर मितालीला तिचं एक नवीन वेड सापडलं आहे. फार आधीपासून हे वेड तिच्यात होतं पण हे वेड मिळवण्यासाठी कसं झगडावं हे तिने शोधून काढलं. ते वेड म्हणजे फिरणं. सध्या मिताली फिरण्यावर विशेष मेहनत घेत आहे. तिला फिरायला भयंकर आवडतं. आणि तिने जर का हे ठरवलं आहे की, मला जग फिरायचं तर त्या दृष्टीने काम करायला हवीत, आणि त्यासारखी काम करायला हवीत हे तिने समजून घेतलंय. एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर त्या ठिकाणी तिकिटाचे पैसे तिने स्वतः भरले, तर त्या ठिकाणी राहण्यासाठी, फिरण्यासाठी तिथल्या कंपनींबरोबर संवाद साधून त्यांच्याशी जाहीरांतींबाबत चर्चा करून व्यावसायिक नातं ती सांभाळते”.

आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर फिरायला गेली अन्…”, आईच्या दुसऱ्या लग्नानंतरच्या पाडव्याबाबत सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “तिच्या आयुष्यात हस्तक्षेप…”

“स्वतः सुद्धा ती घरात काम करताना कंपनीसारखचं म्हणजे जसं की चार पाच लोक हाताखाली कामाला आहेत असं वागते पण ती एकटीच सगळ्या गोष्टी सांभाळत असते. आणि फिरायला जाण्यासाठी त्या सर्व गोष्टी ती स्वतः जुळवून आणते. याला ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर, फुकटात फिरायला जाता येणं असं म्हणतात. पण ते फुकटात फिरायला जाणं याच्यासाठी तुम्हाला पैशाव्यक्तिरिक्त काही तरी देण लागतं. तिची बौद्धिक क्षमता, तिची त्या कंपनींबरोबर बोलण्याची पद्धत हे आहेच. एखाद्या कंपनीने जाहिरातीचा डेमो मागितला तर ती त्यावर मेहनत करून स्वतःचे पैसे वापरून ती जाहिरात शूट करून त्यांना पाठवते. मितालीसाठी मी आनंदी आहे म्हणण्यापेक्षा मला तिचा जास्त अभिमान वाटत आहे. हे स्वतःच स्वतः घडवणं अवघड आहे. हे टॅलेंट माझ्यामध्ये नाही हे मी स्वीकारतो”.

ट्रोलर्सच्या यावर येणाऱ्या कमेंटवरून बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “मी अजिबात ट्रोलर्सवर चिडणार नाही, कारण हे कसं करतात हे त्यांना माहित नाही. अर्थात मालिका, चित्रपट काहीच हातात नसताना कसे फिरू शकतात हा प्रश्न मलाही पडला असता. पण मी तिचा नवरा आहे त्यामुळे मला हे माहित आहे. परदेशातील क्लाईंट असतील तर पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्या वेळेत बोलावं लागतं. त्याच्या मागे लागून, त्यांचा फॉलोअप घेऊन ते काम मिळवणं सोप्प नाही. आणि या कामाची मेहनत दिसून न येता या कामाची मज्जा जास्त दिसून येते. एका वर्षात मितालीने ७ वेगवेगळे देश पाहिले आहेत आणि हे करण्यासाठी कौशल्य हे असावंच लागतं. यातील युरोप ट्रिप ही मिताली व मी पैसे साठवून केली आहे, पण यापुढच्या सर्व ट्रिप तिने तिच्या बुद्धी कौशल्याने केल्या आहेत”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायकोला पाडव्यानिमित्त दिलं खास सरप्राइज, अचानक गिफ्ट हातात दिला अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ट्रोलर्सबाबत मिताली असंही म्हणाली की, “मी प्रचंड फटकळ आहे. एक अभिनेत्री म्हणून प्रेम मिळतं या अनुषंगाने आम्ही प्रेक्षकांबरोबर पोस्ट शेअर करत असतो. त्यामुळे जेव्हा ट्रोलिंगचा मुद्दा समोर येतो तेव्हा आम्हाला ही वाईट वाटतं”.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressmarathi malikamitali mayekarsiddharth chandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ashwini Mahangade buys a new Tractor

"आई कुठे…" फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे आहे कार, ट्रॅक्टर, बाईक, ट्रकचं कलेक्शन, पुन्हा नवीन ट्रॅक्टर खरेदी करत चालवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.