दिवाळी सण म्हटला की सगळीकडे धामधुम सुरु असलेली पाहायला मिळते. भारतभर मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या घरात दिवाळी मोठ्या थाटात साजरी होताना दिसत आहे. इतरांप्रमाणेही कलाकारांच्या घरीही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिवाळी सणातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘दिवाळी पाडवा’. हा सण विवाहीत जोडप्यांसाठी खूप खास असतो. जसं प्रत्येक सणाचं महत्त्व असतं तसंच या सणाचंही नवरा बायकोच्या आयुष्यात वेगळं महत्त्व असतं. विशेष म्हणजे यादिवशी नवऱ्याकडून बायकोला काहीतरी खास भेटवस्तू मिळणार हे नक्की असतं. त्यामुळे या सणाची बायका खूप आतुरतेने वाट पाहताना दिसतात. तर या दिवाळी पाडव्यानिमित्त अभिनेता अंशुमन विचारेनेही त्याच्या बायकोसाठी म्हणजेच पल्लवी विचारेसाठी पाडव्यानिमित्त खास भेट दिली आहे.(anshuman vichare gave a special surprise gift to his wife)
अंशुमन सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याच्या लेकीबरोबरच्या व्हिडीओंमुळे तो नेहमी चर्चेत असतो. गणपतीच्या वेळी त्याने गावच्या घरी केलेला बायकोसोबतचा डान्स व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. आताही त्याने एक बायकोचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो तिला पाडव्यानिमित्त खास भेटवस्तू देताना दिसत आहे.
या व्हिडीओत त्याची बायको देवाला नमस्कार करताना दिसते. त्यानंतर तिला मागून अंशुमन नविन मोबाईलचा बॉक्स पुढे करतो. ती वळून आश्चर्यचकित होऊन तो बॉक्स हातात घेते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी खुलून दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या भावांनी असं दिसून येत आहे की ती एवढ्या महाग मोबाईलसाठी आश्चर्यचकित झाली आहे. त्या गिफ्टसाठी त्याला धन्यावाद म्हणते आणि त्याला मिठी मारण्यासाठी पुढे येताना दिसते.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनीही व्हिडीओवर लाईक कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकऱ्याने लिहीलं, ‘अरे बाप तीन डोळ्यांचा फोन’, असं लिहीत मजेशीर कमेंट केली आहे. तर अभिनेत्री नंदिनी पाटकरनेही या व्हिडीओवर कमेंट करत, ‘क्या बात है! एकच नंबर!’, असं लिहित व्हिडीओचं कौतुक केलं आहे.