शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई कुठे…” फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे आहे कार, ट्रॅक्टर, बाईक, ट्रकचं कलेक्शन, पुन्हा नवीन ट्रॅक्टर खरेदी करत चालवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 14, 2023 | 2:39 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Ashwini Mahangade buys a new Tractor

"आई कुठे..." फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे आहे कार, ट्रॅक्टर, बाईक, ट्रकचं कलेक्शन, पुन्हा नवीन ट्रॅक्टर खरेदी करत चालवला अन्...; व्हिडीओ व्हायरल

राज्यासह देशात सध्या दिवाळीचा वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसह कलाकार मंडळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. दिवाळीनिमित्त कलाकार मंडळी घर, गाडी व अन्य वस्तूंची खरेदी केल्याची गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील ईशा म्हणजे अपूर्व गोरे हिने एक आलिशान कार खरेदी केल्याची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली होती. आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली. (Ashwini Mahangade buys a new Tractor)

‘आई कुठे काय करते’ मध्ये अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत एका ट्रॅक्टर खरेदी केलं. ही आनंदाची बातमी तिने इंस्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना दिली आहे. या ट्रॅक्टरबरोबरचा एक व्हिडीओ तिने नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला. ज्यामध्ये अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ महांगडेदेखील दिसत आहे. यावेळी अश्विनीने ट्रॅक्टरची खरेदी केल्यानंतर ती ट्रॅक्टर चालवताना दिसली. यावेळी अश्विनी व तिच्या भावाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत आहे.

हे देखील वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायकोला पाडव्यानिमित्त दिलं खास सरप्राइज, अचानक गिफ्ट हातात दिला अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

या व्हिडीओला कॅप्शन देताना अश्विनी म्हणाली, “भावाने ट्रॅक्टर घेतला. नाना… आम्ही स्वराज्य वाढवू आणि टिकवू सुद्धा.” तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याचबरोबर, मालिकेतील कांचन आजी म्हणजे अर्चना पाटकर यांनी “ट्रॅक्टर चालवताना कमाल दिसतेस”, अशी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. याआधी अभिनेत्रीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये विविध कार्स, ट्रॅक्टर, जेसीबी यंत्रणे व पिकअप व्हॅन दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती भावुक होत म्हणाली होती की, “स्वराज्य… ते उभे केले नानांनी, अगदी स्वतःच्या हिमतीवर. आता ते टिकवणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे.” तिच्या याही पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली होती.

हे देखील वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’ फेम तितिक्षा तावडेने आईबरोबर घरीच बनवला स्वयंपाक, पुरी-भाजी, पुलाव अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनीने विविध मालिका व चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. ज्यात, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील राणूअक्का ही भूमिका विशेष गाजली होती. त्याचबरोबर ती ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनय क्षेत्राबरोबर ती एक सामाजिक संस्था चालवत असून या माध्यमातून ती अनेकदा सामाजिक कार्य करताना दिसते. लवकरच तिचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: aai kuthe kaay karteAshwini Mahangadeashwini mahangade brotherAshwini Mahangade buys a new Tractor
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sonalee Kulkarni New Home

सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, फोटो शेअर करत दाखवली झलक, कसं आहे अभिनेत्रीचं घर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.