मनोरंजनसृष्टीत दमदार अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला आहे. मालिका, नाटक तसेच चित्रपटातून दमदार अभिनय करत तिने प्रेक्षकांची मन जिंकली. तिने हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित “रॉकी और रानी की प्रेम कहानी” या चित्रपटात काम करत त्यांनी रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकरली.तिने साकरलेल्या या भूमिकेचं सगळीकडे बरंच कौतुक होत आहे. पण सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. क्षितीचं फेसबुक पेज हॅक झालं असल्यांची माहिती समोर आली असून याबाबत तिने स्वतःच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली.(Kshitee Inform About Her FB Page Hacked)
कलाकार मंडळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. विविध फोटो, व्हिडिओ तसेच विविध रिल्स शेअर करत त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग चाहत्यांसह शेअर करतात. या सगळ्यात त्यांना विविध त्रासांना सामोरं जावं लागतं. कधी ट्रोल तर कधी विविध कमेंटमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.
वाचा – काय केली क्षितीने पोस्ट? (Kshitee Inform About Her FB Page Hacked)
पण कधीकधी हा त्रास तांत्रिक स्वरुपाचाही असतो. बऱ्याचदा कलाकारांची अकाऊंट हॅक झाली आहेत. मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचंही काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पेज हॅक झालं होतं. त्यानंतर आता क्षितीचं ही फेसबुक पेज हॅक झालं आहे. तिने ही माहिती चाहत्यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कळवली.
फेसबुकवरील अकाऊंटबाबत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत त्यांनी, “चलचित्र मंडळीची निर्मिती, अभिनेत्री क्षिती जोश यांचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावं. आम्ही पेज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा, हीच विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर चलचित्र मंडळी”, असं म्हणत चाहत्यांना माहिती दिली आहे.