मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर प्रतिक्षा संपली! लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या Inside Details

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 2, 2024 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
panchayat webseries season 3 update

अखेर प्रतिक्षा संपली! लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या Inside Details

ओटीटीवर सध्या नवनवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपट, मालिकांपेक्षा सध्या वेबसीरिजला खूप जास्त पसंती मिळत आहे. त्यातील एक लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’चा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा फुलेरा गावातील मजा मस्ती पाहायला मिळणार आहे. २०२० साली या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गावची पार्श्वभूमी असलेल्या आणि काहीतरी नवीन विषय असल्याने या सीरिजला खूप पसंती मिळाली होती. पहिल्या सीझनच्या यशानंतर २०२२ साली दूसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला होता. यालादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर या सीरिजचे चाहते तिसऱ्या सीझनची वाट पाहू लागले. पण ही प्रतीक्षा आता संपली आहे. (panchayat webseries season 3 update)

२०२० साली आलेल्या या वेब सीरिजने सगळ्यांचीच मने जिंकली होती. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय, निना गुप्ता, अशोक पाठक आंचल तिवारी हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून आले होते. सर्वांच्याच भूमिका अप्रतिम असून संगल्याने त्यांचे काम चोख पार पाडले आहे. दुसऱ्या सीझननंतर सगळे जण तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहू लागले होते. प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ‘पंचायत’च्या निर्मात्यांनी तिसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

आणखी वाचा – Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

सगळ्यांची आवडती सीरिज ‘पंचायत ३’ आता २८ मे २०२४ रोजी ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती ‘प्राइम व्हिडीओ’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडियावर सीरिजचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, “तुम्ही सर्व दुधी बाजुला केलीत, आम्ही तुम्हाला आता रिवॉर्ड देऊ. ‘पंचायत सीझन ३’ आता २८ मे पासून प्राइमवर पहा”.

आणखी वाचा – “खूप गैरसमजही झाले पण…”, ‘चला हवा येऊ द्या’ला १० वर्ष होऊनही कार्यक्रमात न दिसण्यावरुन निलेश साबळेचा खुलासा, म्हणाला, “माझ्या न येण्याने…”

प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्याआधी सीरिजच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक प्रश्न तयार केला होता. त्यांनी एका चित्रांमध्ये खूप सारे दुधी दाखवले होते. ते हटवायचे होते. काही लोक हा गेम खेळताना खूप वैतागलेदेखील. काहींनी खूप छान खेळले तर काहींना हे खेळायला जमलेच नाही.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

दरम्यान प्रदर्शनाची तारीख समोर आल्यानंतर चाहते खूप खुश झालेले दिसून येत आहेत. तसेच पोस्टवर अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “बिनोंद, बघतोयस ना? कशी तारीख सांगितली ते”. प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता चाहते वेबसिरिजीची आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags: new seasonPanchayatwebseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Onkar Bhojane expressed his opinion on the comparison between his work.

"मला त्यामध्ये काहीच रस नाही", इतर विनोदी कार्यक्रमांबरोबर होणाऱ्या तुलनेवर बोलला ओंकार भोजने, म्हणाला, "माझा प्रवास हा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.