छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. जुईने मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे ती चर्चेत आहे. जुई अगदी सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जुई सार्वजनिक वाहनाने प्रवास करत होती. ती कर्जतमध्ये राहते. ट्रेनने प्रवास करण्याच्या जुईच्या बऱ्याच आठवणी आहेत. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे.
जुई सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. खासगी आयुष्यामधील बऱ्याच गोष्टी ती उघडपणाने बोलते. आताही तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची जुईने अगदी दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत विचारलं. दरम्यान जुईने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात भरती होती गश्मीरची आई, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आई आता…”
यादरम्यान चाहत्याने जुईला विचारलं की, “तुम्ही कधी गर्दीच्या वेळी कर्जत-मुंबई किंवा ठाणे-मुंबई ट्रेनने प्रवास केला आहे का?”. यावर जुईने उत्तर देत जुन्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “हो, मी प्रवास केला आहे. ट्रेनमध्ये चढणं माझ्यासाठी खूप सोप होतं”.

पुढे ती म्हणाली, “मी फक्त ट्रेनमध्ये उभी राहायचे. बायका मला ढकलून मस्त ट्रेनमध्ये चढू द्यायच्या. आता विनोद बस झाला. पण ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव मी विसरुच शकत नाही. आता मला ट्रेनची भीती वाटते. गर्दीच्या वेळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या सगळ्यांचं कौतुक”. जुईने आता स्वतःची गाडी खरेदी केली आहे. आता ती गाडीने प्रवास करते. पण जुने दिवस आणि त्या आठवणी ती अजूनही विसरलेली नाही.