Ankita Lokhande Father Death : सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील श्रीकांत लोखंडे यांचं शनिवारी (१२ ऑगस्ट) निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीकांत लोखंडे यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अंकिता व तिच्या आईची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. तर अंकिताने पुढाकार घेत वडिलांना खांदा दिला. यावेळी ती पूर्ण कोलमडून गेली आहे. वडिलांच्या निधानंतर एक सुंदर व्हिडीओ शेअर करत अंकिताने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अंकिताने शेअर केलेल्य व्हिडीओमध्ये तिने वडिलांबरोबर घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना अंकिता अगदी भावुक झाली होती. अंकिता म्हणाली, “बाबा मी तुमच्याबाबत शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नाही. मी तुमच्यासारखं कणखर, उत्साही व्यक्तीमत्त्व माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाहिलेलं नाही. जेव्हा तुम्ही आम्हाला सोडून गेलात तेव्हा तुमच्याबाबत अनेक गोष्टी मला कळाल्या”.
आणखी वाचा – Video : अंकिता लोखंडेनेच दिला वडिलांना खांदा, अभिनेत्रीची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले
“जे लोक तुम्हाला भेटायला आले ते लोक तुमचं कौतुकच करत होते. तुम्ही कशाप्रकारे सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलत होतात हे त्यांनी सांगितलं. कोणाची आठवण आली तर व्हिडीओ किंवा वॉईस कॉलवर तुम्ही कशाप्रकारे लोकांशी संवाद साधत होतात हेही अनेकांनी आम्हाला सांगितलं. प्रत्येक व्यक्तीबरोबर असणारं तुमचं नातं तुम्ही जिवंत ठेवलं. आता मला कळतं की, मीही अशी का आहे? मी अशी आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांना मोठा दुःखद धक्का
पुढे अंकिता म्हणाली, “तुम्ही मला नेहमीच चांगलं आयुष्य, आठवणी, नाती दिली. कधीच हार मानायची नाही हे तुम्ही मला शिकवलं. तुम्ही माझ्या पंखांना बळ दिलं आणि आयुष्य आनंदाने जगायचं हे शिकवलं. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही कारण तुम्ही माझ्या आत्म्याचाच एक भाग आहात. गेल्या तीन दिवसांपासून मी व आई हाच विचार करत आहोत की, सकाळी उठल्यानंतर काय करावं?. कारण बाबा काय खाणार, बाबा कोणती फळं खाणार, बाबा नाश्ता काय करणार हेच आमचं सुरु असायचं. पण आता आमच्याजवळ काहीच उरलं नाही. कारण तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात. तुम्ही लकी आहात की, तुम्हाला माझ्या आईसारखी पत्नी मिळाली. तिने तुम्हाला तिचं सर्वकाही दिलं. मला माहित आहे की, तुम्ही तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता”. त्याचबरोबरीने आईचा आयुष्यभर सांभाळ करण्याचं वचनही अंकिताने वडिलांना दिलं आहे.