सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायका मला ढकलून…”, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची जुई गडकरीला भीती, म्हणाली, “आता मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 16, 2023 | 10:10 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
mumbai local train

“बायका मला ढकलून...”, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची जुई गडकरीला भीती, म्हणाली, “आता मला...”

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. जुईने मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे ती चर्चेत आहे. जुई अगदी सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जुई सार्वजनिक वाहनाने प्रवास करत होती. ती कर्जतमध्ये राहते. ट्रेनने प्रवास करण्याच्या जुईच्या बऱ्याच आठवणी आहेत. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे.

जुई सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. खासगी आयुष्यामधील बऱ्याच गोष्टी ती उघडपणाने बोलते. आताही तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची जुईने अगदी दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत विचारलं. दरम्यान जुईने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात भरती होती गश्मीरची आई, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आई आता…”

यादरम्यान चाहत्याने जुईला विचारलं की, “तुम्ही कधी गर्दीच्या वेळी कर्जत-मुंबई किंवा ठाणे-मुंबई ट्रेनने प्रवास केला आहे का?”. यावर जुईने उत्तर देत जुन्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “हो, मी प्रवास केला आहे. ट्रेनमध्ये चढणं माझ्यासाठी खूप सोप होतं”.

आणखी वाचा – “तुम्ही आम्हाला सोडून गेलात तेव्हा…”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “गेले तीन दिवस…”

पुढे ती म्हणाली, “मी फक्त ट्रेनमध्ये उभी राहायचे. बायका मला ढकलून मस्त ट्रेनमध्ये चढू द्यायच्या. आता विनोद बस झाला. पण ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव मी विसरुच शकत नाही. आता मला ट्रेनची भीती वाटते. गर्दीच्या वेळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या सगळ्यांचं कौतुक”. जुईने आता स्वतःची गाडी खरेदी केली आहे. आता ती गाडीने प्रवास करते. पण जुने दिवस आणि त्या आठवणी ती अजूनही विसरलेली नाही.

Tags: entertainment newsjui gadkarimarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
taali web series

"टाळी जेव्हा जोरात वाजते तेव्हा…", 'ताली' वेबसीरिज पाहिल्यानंतर पहिल्यांदाच बोलल्या गौरी सावंत, म्हणाल्या, "तृतीयपंथीयांच्या पालकांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.