गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बड्या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसणार संतोष जुवेकर, म्हणाला, “चित्रपटात विकी कौशल, अनिल कपूर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 21, 2023 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Santosh Juvekar about his Bollywood Film

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बड्या बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसणार संतोष जुवेकर, म्हणाला, "चित्रपटात विकी कौशल, अनिल कपूर…"

गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात धुमधडाक्यात हा सण साजरा केला जर असून अनेकांच्या घरी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अभिनेता संतोष जुवेकरच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून त्याच्या हस्ते बाप्पाची पूजा देखील झाली आहे. (Santosh Juvekar about his Bollywood Film)

संतोषने गणेशोत्सवानिमित्त नुकताच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला होता. यावेळी त्याने बाप्पाबरोबरच्या आठवणी सांगताना त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलला आहे. संतोषकडे सध्या अनेक चित्रपट असून नुकताच त्याने दोन मराठी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित आहे. ज्यात संतोष अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना यांसारख्या कलाकारांसह स्क्रीन शेअर करणार आहे.

हे देखील वाचा – “भाड्याच्या घरात राहत होतो पण…”, शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, म्हणाली, “गेल्यावर्षी आम्ही…”

याबाबत बोलताना संतोष म्हणाला, “बाप्पाच्या कृपेने बरीच कामे मला येत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतात. मी नुकताच ‘रानटी’ नावाचा चित्रपट पूर्ण केला असून ज्यामध्ये मी आणि शरद केळकर मुख्य भूमिका साकारत आहोत. तर चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड आहे. त्याचबरोबर आणखी एक मराठी फिल्म मी केली आहे, जी लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.”

हे देखील वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अभिनेत्रींनी केली सुप्रिया पाठारेंच्या घरच्या बाप्पाची सजावट, म्हणाल्या, “दादरला जाऊन त्यांनी…”

तर संतोषने त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. “मी सध्या ‘छावा’ नावाचा हिंदी चित्रपट करतोय, ज्याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित आहे. एका ऐतिहासिक चित्रपटाचा, त्या इतिहासाचा, कलेचा भाग होणं हे मी फार मोठं भाग्य मानतो. या चित्रपटात मी फार सुंदर आणि महत्वाची भूमिका करत असून मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, आशुतोष राणा हे हिंदीतील कलाकारांसह मी, सारंग साठ्ये, निलवंती पाटेकर हे मराठी कलाकार आहेत. चांगल्या कलाकारांसह काम करण्याची संधी मला मिळत असून मोठ्या कॅनव्हासवर काम करण्याचा हा माझा पहिला व मोठा प्रयत्न आहे. आणि हे सर्व गणपती बाप्पामुळे शक्य झाले आहे.”, असं संतोष म्हणाला.

Tags: ganeshotsav 2023its majja exclusivemarathi actorsantosh juvekar
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
prajakta mali share a video and photo

घरी गणरायाचे आगमन अन् मानाच्या गणपतींचे दर्शन, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाली, "भाचीचं गणपती स्तोत्र पठण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.