संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. आपल्या लाडका बाप्पा घरी विराजमान झाला आहे. त्यांची सेवा करण्यात सगळे मग्न झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे बाप्पामय वातावरण झालं आहे. मराठी कलाकारांच्या घरी जसा बाप्पा विराजमान झाला आहे तसा बॉलिवूड व दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील बाप्पाला घरी आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाप्पाच्या येण्याने सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. नुकतीच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कशाप्रकारे बाप्पाचं कशाप्रकारे स्वागत केलं आहे. गणेश चतुर्थीचा पहिला दिवस कशाप्रकारे साजरा केला हे सांगितलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने बाप्पाबरोबरचे क्षण शेअर केले आहेत. (prajakta mali share a video and photo)
बाप्पा घरात येणं हा वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. बाप्पाची आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत असतो. मोदकाचा नैवेद्य, बाप्पासाठी पंच पक्वनांचं जेवण आणि असं बरंच काही आपण बाप्पाच्या सेवेत करत असतो. प्राजक्ताचे नुकतेच गणेश चतुर्थीच्या पहिला दिवसाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत प्राजक्ताची भाची दिसत आहे. त्यात ती गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणताना दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राजक्ताने पुण्यातील ५ मानाच्या गणपतींचंही दर्शन घेतलं.
या फोटोंना कॅप्शन देत ती लिहीते की, ‘भाचीचं गणपती स्तोत्र पठण, मानाच्या ५ गणपतींच दर्शन, भाऊ रंगारी-महाआरती, घरात पुरी-भाजी श्रीखंड बेत, ४ उकडीचे १ तळलेला मोदक फस्त. गणेश चतुर्थी उत्साहात साजरी झाली’, असं लिहीलं आहे. तिने गणेश चतुर्थीचा दिवस कशाप्रकारे साजरा केला हे थोडक्यात या पोस्टमधून सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने खाल्लेल्या सर्व गोड पदार्थांची यादी तिने सांगितली आहे.
प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या व्हिडीओ व पोस्टवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट केले आहेत. ‘किती गोड बाळ, खूप छान’, म्हणत एका नेटकऱ्याने तिच्या भाचीचं कौतुक केलं आहे. ‘तुमचं साखरेचं पोत तर मोठं झालं आहे ओ प्राजक्तजी’, असं म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे.