शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Majjacha Adda : “हिंदी चित्रपटांना अर्थच नाही, शोबाजी अन्…”, अशोक सराफांचा हिंदीसह मराठी चित्रपटांवरही निशाणा, म्हणाले, “दुर्देव आहे की मराठी लोकांना…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 16, 2023 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor ashok saraf talk on recent and past film promotions aswell hindi movies in majjacha adda show

"हिंदी चित्रपटांना अर्थच नाही, शोबाजी अन्…", अशोक सराफांचा हिंदीसह मराठी चित्रपटांवरही निशाणा, म्हणाले, "दुर्देव आहे की मराठी लोकांना…"

Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी नाटक, मालिका व चित्रपटसृष्टीमध्ये ‘विनोदाचा सम्राट’ म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकृतींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिका करण्यातदेखील त्यांची ख्याती आहे. अशोक सराफ यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अशोक सराफ यांनी मज्जाच्या टीमसह दिलखुलासपणे संवाद साधला.  (Ashok Saraf Majjacha Adda)

यावेळी “अलिकडे चित्रपटांचे प्रमोशन अधिकाधिक करण्यात येतं. पण याआधी चित्रपटांचं प्रमोशन फार कमी व्हायचं.”याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत अशोक सराफ यांनी असे म्हटले की, “आधी टीव्हीही नव्हता. फक्त हिंदी चित्रपट व रेडिओ असायचे. इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे चित्रपट कधी येणार, चित्रपटगृहामध्ये कधी लागणार याची प्रेक्षक वाट बघत असायचे. मराठीसह हिंदीमध्येही तिच परिस्थिती होती. पण हळूहळू पद्धती सुधारु लागल्या. आता लोकांना आठवण करुन द्यावी लागत आहे की, आम्ही येत आहोत. प्रमोशन सुरु झालं म्हणून लोक चित्रपट बघण्यासाठी येतातच असं नाही. कुठलाही चित्रपट हा चित्रपट काय आहे याच्यावर चालतो. मात्र, हिंदी चित्रपटांची गोष्टच वेगळी आहे. तिकडे शोबाजी जास्त आहे. त्याला काही अर्थ नाही.” असं ते म्हणाले.

आणखी वाचा – धमाल-मस्ती, खास पदार्थ अन्…; स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचं रोहित राऊतने केलं थाटामाटात केळवण, फोटो व्हायरल

यापुढे हिंदी चित्रपटांबाबतही भाष्य करताना ते असे म्हटले की, “मराठी चित्रपट हा जास्तीत जास्त माऊथ पब्लिसिटीवर चालतो. मराठी चित्रपट चांगला आहे हे एकाने दुसऱ्याला सांगितले तर इतर लोक तो चित्रपट बघायला जातात. इतरांच्या सांगण्यावरुन मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघायला जातात. हिंदीसारखं ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ असं मराठी चित्रपटांबाबत होत नाही. हल्ली मल्टिप्लेक्सही वाढले आहेत. आमच्यावेळी चित्रपटांचे शो अधिक लागायचे नाहीत. हल्ली चित्रपट बघायला या म्हणून लोकांना बोलवायला लागतं. मराठी चित्रपट बघायला मराठी प्रेक्षकांनाच बोलवायला लागत आहे हे केवढं मोठं दुर्देव आहे. चित्रपटांचं प्रमोशन करावं लागत आहे ही वाईट गोष्ट आहे. पूर्वी पेपरमध्ये फक्त एक जाहिरात यायची. पण आता पेपर कोणी वाचतच नाही. आता सोशल मीडियावर प्रसिद्धी करावी लागते. तरीही प्रेक्षक येतीलच हे सांगता येत नाही.”

आणखी वाचा – लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अशोक सराफ यांनी अनेक मुद्द्यांवर अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला. अनेक विषयांना त्यांच्या खास शैलीत उत्तरे देत ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात गप्पा मारल्या. त्याचबरोबर अनेक प्रश्नांवर त्यांनी त्यांची दुसरी बाजुही मांडली. दरम्यान, अशोक सराफ हे आगामी काळात कोणत्या नवीन चित्रपटांतून त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार? यांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे

Tags: ashok sarafAshok Saraf in Majjacha AddaAshok Saraf latest interviewentertainmententertainment newsmajjacha addaMajjacha Adda with Ashok Sarafmarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
मज्जाचा अड्डा अशोक सराफ

Majjacha Adda : "अजूनही लोक मला घाबरतात कारण…", अशोक सराफांनी सांगितली त्यांच्यी दुसरी बाजू, पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाले, "फालतुगीरी, अश्लिलता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.