सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात अगदी शाही पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. यानंतर सुरुची-पियुष हे दोघेही विवाहबंधनात अडकले. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अगदी साधेपणाने लग्न पार पडले. अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding)
अशातच त्यांच्या केळवणाची लगबग सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच त्यांच्या घरच्यांनी केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर नुकतेच आशिष-स्वानंदी यांच्या मित्रपरिवाराकडून केळवण आयोजित केले होते. गायक-संगीतकार रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, संगीतकार देवदत्त बाजी, गायक नचिकेत लेले व आदिनाथ पाटकर यांनी त्यांच्या मित्रांसाठी खास केळवण आयोजित केले होते. याचे काही क्षण जुईलीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?
केळवणाचा फोटो शेअर करत तिने “केळवण पार पडले” आणि “आता फक्त ११ दिवस बाकी” असं म्हटलं आहे. यावरून स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाला फक्त काहीच दिवसच राहिले असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार व चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेकजण त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.
आणखी वाचा – Video : कोकणात स्वतःच्या गावी पोहोचली पूजा सावतं, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझं घर…”
दरम्यान, अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. तो ‘इंडियन आयडल’च्या गेल्या पर्वात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून त्याने अनेक उत्तमोत्तम गाणी गात रसिकश्रोत्यांची मनं जिंकली.