शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Majjacha Adda : “अजूनही लोक मला घाबरतात कारण…”, अशोक सराफांनी सांगितली त्यांच्यी दुसरी बाजू, पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाले, “फालतुगीरी, अश्लिलता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 16, 2023 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
मज्जाचा अड्डा अशोक सराफ

Majjacha Adda with Ashok Saraf Interview

Majjacha Adda with Ashok Saraf : गेले पाच दशक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सर्वांचेच लाडके अभिनेते म्हणजे अशोक सराफ. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर देखील आपल्या कामाचे तारुण्य जपत आजही ते अनेकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या लोभस स्वभावामुळे ते सर्वांनाच आपले वाटतात. मात्र अशोक सराफ नेमके कसे आहेत. खऱ्या आयुष्यात ते तितकेच विनोदी आहेत का? लोकांना हवेहवेसे वाटणाऱ्या अशोक मामांबद्दल अनेकांच्या मनात मात्र आदरयुक्त भीती आहे.

अशोक सराफ यांनी इट्स मज्जाच्या मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी स्वतःच्या स्वभावाच्या दुसऱ्या बाजुबाबत बोलताना अशोक मामा म्हणाले की, “मी प्रेक्षक व चाहत्यांशी जोडला गेलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांनी मला आपलसं केलं आहे. प्रेक्षकांना जे आवडेल तेच मी आतापर्यंत करत आलो आहे. मी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची फालतुगीरी केलेली नाही. अश्लीलतेच्या बाजूनेही कधी गेलो नाही. ज्याच्यामधून लोकांना मजा येईल अशी शुद्ध, सरळ कॉमेडी मी केली” असं ते म्हणाले.

आणखी वाचा – “झाडाची कत्तल करणाऱ्या लोकांना…”, जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट, म्हणाला, “महामार्ग निर्माण करण्यासाठी…”

स्वतःच्या स्वभावाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “लोकांचं मनोरंजन करणं हाच माझा हेतू राहिला आहे. एरव्ही मी अधिक बोलत नाही. कारण जास्त बोलणं हा माझा स्वभाव नाही. मी गप्प बसतो त्यामुळेही लोकांचा गैरसमज होतो. हा बोलत नाही यांच्याकडे कसं जायचं असा विचार लोक करतात. पण मी गप्प बसतो. काही कारण नसताना मला घाबरतात. मी काहीही केलेलं नसतं. पण लोक मला घाबरतात तेही कित्येकदा बरं असतं. कारण आतापर्यंत मला काय काय ऐकायला लागलं असतं सांगता येत नाही. आम्ही कॉमेडी भूमिका करणारे नट”.

आणखी वाचा – मोठी बातमी! बच्चन कुटुंबियांच्या घरामधून बाहेर पडली ऐश्वर्या राय, घरामध्ये वादाची ठिणगी, चर्चा खऱ्या ठरल्या अन्…

त्यांच्याबद्दलच्या आदरयुक्त भीतीबाबत ते पुढे, “विनोदी कलाकार म्हटलं की, लोकांना असं वाटतं की हा आपल्यातलाच आहे. पण माझ्याबाबत असं काही घडू नये म्हणून मला तसं राहायला लागतं. माझे जे खास लोक आहेत त्यांच्याबरोबर मी नेहमीच विनोदी असतो. ‘व्हॅक्युम क्लिनर’ माझं नाटक आहे. या नाटकाच्या आधी स्टेजवर खेळीमेळीचं वातावरण असतं. यामुळे ज्येष्ठ कलाकार म्हणून इतर कलाकारांच्या मनात माझ्याबाबत जी भीती असते ती निघून जाते. आणि कामही अगदी उत्तम होतं”, असंही म्हणाले.

Tags: ashok sarafAshok Saraf in Majjacha AddaAshok Saraf latest interviewItsmajja exclusive interview of ashok sarafMajjacha Adda with Ashok Saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Anup Ghoshal Passes Away

"तुझसे नाराज नही जिंदगी" गाण्याचा आवाज हरपला, गायक अनुप घोषाल यांचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.