गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2023 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor prasad jawade entry in savali hoin sukhachi serial new promo out

लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख हे गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. अशातच गेल्या महिन्यात ही जोडी एकेमकांबरोबर शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकली. लग्नामुळे चर्चेत असलेला अभिनेता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसाद लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Prasad Jawade New Serial Entry)

सन मराठी वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या नव्या प्रोमोमध्ये प्रसाद झळकला आहे. मालिकेतील त्याच्या भूमिकेचं नाव ‘समर’ असं आहे आणि या मालिकेत त्याची भूमिका नकारात्मक असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे त्याच्या या नवीन भूमिकेसाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

आणखी वाचा – धमाल-मस्ती, खास पदार्थ अन्…; स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचं रोहित राऊतने केलं थाटामाटात केळवण, फोटो व्हायरल

या मालिकेआधी प्रसाद कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने ‘प्रितम’ ही भूमिका साकारली होती. पण लग्नामुळे प्रसादने या मालिकेमधून एक्झिट घेतली होती. त्याच्या एक्झिटनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रसादच्या एक्झिटनंतर मालिकेत त्याच्याऐवजी आदिश वैद्य या अभिनेत्याची एण्ट्री झाली.

आणखी वाचा – “त्याचं हृदय १० मिनिटांसाठी बंद पडलं अन्…”, श्रेयस तळपदेबाबत बॉबी देओलचा मोठा खुलासा, म्हणाला, “त्याची पत्नी…”

दरम्यान, आता लग्नानंतर प्रसाद-अमृता आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. अमृताच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे दौरे चालू झाले आहेत तर प्रसादही नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामुळे प्रसाद-अमृताचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. दरम्यान, मालिकेतली प्रसादची एण्ट्री पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. या नवीन प्रोमोखाली कमेंट्सद्वारे चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newsmarathi serialprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Dhruv Datar Wedding

'तू चालं पुढे' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, शाही थाटात पार पडलं लग्न, पाहा काही खास क्षण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.