शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “वाटाणे, कोबी आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2023 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor prasad jawade made special dinner for her wife actress amruta deshmukh photo viral on instagram

लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, "वाटाणे, कोबी आणि..."

‘बिग बॉस मराठी’ फेम या शो मधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ या शोमध्ये असताना या कलाकारांची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी शाही विवाह करत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान या कलाकारांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे कायमच दिसून आले आहे. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर एकमकांबरोबरचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांच्या या बातमीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी उपस्थित राहून त्यांच्या सोहळ्याची रंगत वाढवली. त्यांच्या लग्नसमारंभाचे तसेच हळदीचे, संगीतचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Amruta Deshmukh On Instagram)

अमृता-प्रसाद ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यांचे काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. संगीत, हळद, लग्न, त्यानंतर घरातील गृहप्रवेश, पूजा याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्न, त्यानंतर त्यांची लग्नानंतरची पाहिलीची ‘मुव्हीडेट’ आणि नुकताच झालेला प्रसादचा वाढदिवस याचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले होते. अशातच अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या डिनरच्या मेन्यूचा खास फोटो शेअर केला आहे. प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल डिश बनवत तिला खाऊ घालण्याचा बेत केला होता.

आणखी वाचा – “त्याने हात जोडताच ७०० ते ८०० लोक गायब अन्…”, उपेंद्र लिमयेंनी सांगितला ‘तो’ थक्क करणारा अनुभव, म्हणाले, “हेच आपल्याकडे झालं असतं तर…”

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका खास डिशचा फोटो शेअर केला आहे. यात फरसबी, मटार, फुलगोबी, गाजर, दही, मेयोनीज, उकडलेले अंडं यांपासून एक रेसिपी बनवली आहे. या रेसिपीचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत ‘आरोग्यदायी जेवण’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर हा फोटो शेअर करत तिने नवऱ्याला अर्थात प्रसादला “शेफ, कृपया हा फोटो शेअर करा” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : आमिर खानच्या लेकीची हटके लग्न पत्रिका, व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले, नक्की काय आहे खास?

दरम्यान, प्रसादनेही हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्या डिशची रेसिपी सांगितली आहे. प्रसाद हा उत्तम जेवण बनवतो हे तर सर्वांना माहितीच आहे. प्रसाद हा उत्तम जेवण बनवत असून त्याला जेवण बनवण्याची व ते खाऊ घालण्याची खूप आवड आहे असे अमृतानेही अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे लग्नानंतर पुन्हा एकदा प्रसादने लाडक्या पत्नीसाठी म्हणजेच अमृतासाठी खास जेवणाचा बेट करत तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.       

Tags: amruta deshmukhamruta deshmukh and prasad javadeentertainmententertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Junior Mehmood funeral

"हद्द झाली तुम्ही…", ज्युनिअर महमूद यांच्या अंत्यदर्शनाला जॉनी लिव्हर यांनी केलेल्या कृतीमुळे नेटकरी भडकले, म्हणाले, "ही फोटोसेशनची वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.